वीजमीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्या एजन्सींविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकार्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू
पुणे मेट्रो लाईव्ह :
पुणे : वीज मीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्या एजन्सींच्या कामांचे मूल्यांकन करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोंचे प्रमाण 45 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे.चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासा सोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिल ते जून 2022 या 3 महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल 3 (825 द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत वीज मीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे.वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे, याप्रकारे वीजमीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्या एजन्सींविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकार्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू करीत राज्यातील तब्बल 76 मीटररीडिंग एजन्सींना बडतर्फ करण्यात आले; तसेच महावितरणच्या 41 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. रीडिंग अचूक होईल, यासाठी कायम काळजी घेण्यात येईल तसेच वारंवार सूचना देऊनही एजन्सींनी रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाहीत, तर एजन्सींविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची समज देखील एजन्सींना महावितरणने दिली आहे.
Comments
Post a Comment