सुफी संत हज़रत ऐनी शाह (रहे.) यांचा उरुस साजरा झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत उरुस संपन्न झाला . पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : सुफी संत हजरत सैय्यदी पीर ऐनी शाह सहा किला (हे.) यांचा उरुस नुकताच अत्यंत थाटामाटात व उत्साहात पुणे भवानी पेठ येथील रोशन मस्जिद, दुल्हा-दुल्हन कब्रिस्तान येथे साजरा करण्यात आला. उरुसाचे हे ७ वे वर्ष होते. सायंकाळी सहा नंतर सुफी संत हज़रत सैय्यदी पीर ऐनी शाह (रहे) यांच्या मजार शरीफ वर गिलाफ चादर, चढवण्यात आली त्या नंतर हजरत यांचे वारसदार जान शिन मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह) यांनी फातिहा देऊन सलाम पढून उपस्थित सर्वांसाठी दुवाँ व प्रार्थना केली. या नंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजना नंतर हज़रत यांचे वारसदार व जानशिन) मौलाना शाह नजीरुद्दीन (उर्फ मख्तुमी शाह) यांचा विशेष बयान ठेवण्यात आले होते. प्रथम फूलपान करण्यात आले : हजरत यांचे बायान सुरू होण्या लअगोदर रोशन मस्जिदचे हाफीज मौलाना अहमद कादरी यांनी हजरत शाह नजीरुद्दीन उर्फ (मख्तुमी शाह)...