बेडकिहाळ येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद,
शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम.
पुणे मेट्रो लाईव्ह :
बेडकिहाळ, ता,१६, येथील कै बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शुक्रवार (ता १५) रोजी श्रीमती कुसुमावती मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विविध रोग तपासणी शिबिरास बेडकिहाळ सह परिसरातिल नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
स्वागत शिंगाडे सेवाभावी संस्थेचे संस्थापक डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले, तर अजित कांबळे यांनी प्रास्ताविकात शिंगाडे चॅरिटेबलच्या वतीने वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांनची सविस्तर पणे माहिती करून दिली.
या शिबिरा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनुराधा पाटील, पीएसआय (पालघर मुबंई,) डॉ सुनीता पाटील (सांगली ) कृषी पंडित सुरेश देसाई,, डॉ सुरेश कुराडे, (गडहिंग्लज) कारदगा ग्राम पंचायत अध्यक्ष राजू खिचडे, समाजकल्याण आधिकारी जे के पम्मार, आण्णा पाटील, आदी उपस्थीत होते.
उपस्थीत सर्व मान्यवर व डॉकट्स यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. तर ट्रस्टच्या वतीने उपस्थीत सर्व मान्यवरांचा व डॉक्टरांचा सत्कार डॉ विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. तर आपल्या जम्मदिना निमित्त सतत सामाजिक उपक्रम राबवित असलेल्या डॉ विक्रम शिंगाडे यांचा सत्कार उपस्थीत सर्व मान्यवरांनी केला व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरा प्रसंगी मोतीबिंदू, मधुमेह,अस्थमा, गुडघेदुखी, कंबरदुखी, रक्तदाब, दंत चिकित्सा, स्त्रीरोग, तसेच हाडांच्या समंधीत रुग्णाचीं तपासणी, डॉ संजय पाटील, (चिक्कोडी) डॉ शीतल चौगले, (शमनेवाडी,) डॉ अमोल खुरपे, डॉ मयूर एन एस, व डॉ विनय नरसाई (बेडकिहाळ सर्कल शांतीनगर) यानी तपासणी करून रुग्णाना औषधोपचार करून योग्य सल्ला दिला.
अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संघ संघटना संस्थेचे पदाधिकारी सदस्य, ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य असे अनेकजण शिंगाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केक कापून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या प्रसंगी ग्राम पंचायत उपाध्यक्षा जयश्री जाधव, डि एस डोणे, (इचलकरंजी,) सुधाकर माने, विद्याधर कांबळे,(कोल्हापूर ) ग्राम पंचायत सदस्य संजय पाटील. प्रमोद पाटील, गंगाधर सूर्यवंशी, महमद मुल्ला, जीवन पम्मार, ऍड निरंजन कांबळे, ऍड सुदर्शन तम्मन्नवर, अशोक लाखे, विद्याधर कांबळे, गंगाधर सुर्यवंशी, संजू पाटील, अन्वर मुल्ला, वसंत बाबर,संपत बोरगल, नेताजी गोरे, व ग्राम पंचायत सदस्यां, व ट्रस्टचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रीति हट्टीमनी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
Comments
Post a Comment