पुणे मेट्रो लाईव्ह : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 प्रत्येक घर ,ऑफीस ,शाळा सगळ्या ठिकाणी तिरंगा उभारण्यासाठी घर घर तिरंगा अभियान चालवण्यात येत आहे त्याबद्दल काही गोष्टी मला मनापासून वाटतात .त्या आपल्या सोबत शेअर करत आहे . घर घर तिरंगा याअंतर्गत प्रत्येक घर ,ऑफिस, शाळा या ठिकाणी तिरंगा आपण फडकवणार आहोत पण ह्या तिरंग्याचा अभिमान फक्त दोन दिवसासाठी आहे का ? आणि दोन दिवसानंतर म्हणजे 16 ऑगस्टला त्या तिरंग्याचे काय होणार? काही तिरंगे हे कागदी असतील, काही तिरंगे हे प्लास्टिकचे असतील, काही तिरंगे हे कापडाचे असतील पण दोन दिवसांचे अभियान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ह्या तिरंग्याच काय होणार..? तर मला असे वाटते की ...दोन दिवसाचे घर घर तिरंगा अभियान झाल्यानंतर पुढे तो तिरंगा रस्त्यावर फेकला जाऊ नये, तिरंगा कोणाच्या पाया खाली येता कामा नये .तिरंग्याचा अवमान होता कामा नये असे मला वाटते .त्यामुळे घर घर तिरंगा ठीक आहे पण प्रत्येक घराघरातील माणसाच्या मनामध्ये तुम्ही तिरंगा कसा फडकवणार ?फक्त दोन दिवस घरावरती तिरंगा फडकवून खरंच देशप्रेमाची ...