पिंपरी,काळेवाडी परीसरातील पवना नदीपात्रात पूररेषेत भराव टाकणाऱ्या व मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा ; अपना वतन संघटना
पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथील पवना नदीपात्रात पूररेषेत बेकायदेशीर भराव टाकणाऱ्या व मैलामिश्रित सांडपाणी नदीत सोडून नदी प्रदूषित करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिध्दीकभाई शेख यांनी आज दि. २७/७/२०२२ रोजी पिंपरी चिंचवड महापालीकेचे आयुक्त राजेश पाटील , उप प्रादेशीक अधीकारी ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटंले आहे की, काळेवाडी , बीआरटी रोड च्या लागत परिसरामध्ये नदीच्या पात्रात भराव टाकून अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. त्यामध्ये वोर्कशॉप , फॅब्रिकेशन , हॉटेल्स , मंगल कार्यालये , गोडाउन्स अशा आस्थापनांचा समावेश आहे . शहरात काही जणांनी पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा ध्यास घेतलेला आहे . प्रदूषणच्या नियमांची पायमल्ली करीत अनेकांनी नियम धाब्यावर बसवलेले आहेत. काळेवाडी स्मशानभूमी च्या माघे एका ठेकेदारामार्फत खिल्लारे इन्फ्रस्टकचर लिमीटेड या कंपनीकडून नदीपात्रात काम चालू आहे.परंतु त्यांच्याकडून प्रदूषण व पर्यावरण विषयक नियमां...