पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी कडून अद्यापही लढविण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची संयुक्त बैठक झालेली नाही.त्यामुळे पोटनिवडणूक कोणता पक्षाचा उमेदवार असेल हे निश्चित न झाल्याने तिन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून वैयक्तिक पातळीवर तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. पक्षाची बैठक, इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा, इच्छुकांच्या मुलाखती असे प्रकार महाविकास आघाडीत सुरू झाले आहेत. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविली जाईल, अशी चर्चा तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असली तरी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरी घोषणा न झाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून भारतीय जनता पक्...