संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता इचलकरंजी येथे
संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार प्रियाताई वैद्य , सुनिल सरवदे , दादासाहेब यादव ,दिवगंत नेते प्रा .मधूकर वायदंडे ( मरणोत्तर ) दगडू माने, शाहीर रफिक पटेल अजित गादेकर ,प्रमोद कदम यांना जाहीर पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर : पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना , संघर्षनायक मीडिया व समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारा संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता इचलकरंजी येथे संपन्न होणार असल्याची माहिती पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दातार व संघर्षनायक मीडियाचे व्यवस्थापक समिर विजापूरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे.दिली आहे पुरस्काराचे वितरण पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर ) व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतभाई मुळे , अॅड .राहूलराज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे दयावान सरकार ग्रुपच्या धडाडीच्या नेत्या प्रियाताई वैद्य ( मुंबई ) CWC न्यूज चैनल संपादक सुनील सरवदे ,दादासाहेब यादव ( रमाई घाटकोपर नग...