Skip to main content

Posts

Showing posts from August 25, 2022

कांग्रेस के दिग्गज नेता गुलाम नबी आजाद ने कांग्रेस के सभी पदों से इस्तीफा दिया

पुणे मेट्रो लाईव्ह : कांग्रेस के दिग्गज नेता गुलाम नबी आजाद ने कांग्रेस के सभी पदों से इस्तीफा दे दिया है। वे लंबे अर्से से पार्टी से नाराज चल रहे थे। वे पार्टी के अंदर बदलाव की मुहिम चलाने के समर्थक माने जाते थे। आजाद ने कुछ दिन पहले प्रचार समिति से भी इस्तीफा दे दिया था। आजाद ने पांच पेज का इस्तीफा सोनिया गांधी को भेजा है। उन्होंने अपने इस्तीफे की चिट्ठी में लिखा-बहुत अफसोस और बेहद भावुक दिल के साथ मैंने कांग्रेस से अपना आधा सदी पुराना रिश्ता तोड़ने का फैसला लिया है। उन्होंने अपनी चिट्ठी में इस बात का उल्लेख किया है कि कांग्रेस को भारत जोड़ो यात्रा की जगह कांग्रेस जोड़ो यात्रा निकालनी चाहिए।  गुलाम नबी आजाद की गिनती पार्टी के बेहद सीनियर नेताओं में होती थी और वे गांधी परिवार के बेहद करीबी नेताओं में एक माने जाते थे। लेकिन 2019 के बाद से पार्टी के अंदर बदलाव की आवाज उठने लगी और फिर जी-23 ग्रुप का उभार हुआ। इसमें वो नेता शामिल थे जो पार्टी में आमूलचूल परिवर्तन की मांग उठा रहे थे। इन नेताओं में गुलाम नबी आजाद भी बेहद मुखर थे। इससे गांधी परिवार से उनकी दूरी बढ़ती जा रही थी।...

पुणे, पिंपरी - चिंचवड मधील कलाकारांसाठी दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण

  गरजू कलाकारांना मिळणार मोफत रुग्णवाहिकेची सुविधा पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : एखाद्या निर्मात्याने रंगभूमी आणि चित्रपट कलाकार, तंत्रज्ञांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे हा निश्चितच चांगला उपक्रम आहे. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. कोरोनाच्या काळात कलाकार, तंत्रज्ञ यांना वेळेवर रुग्णवाहिका व औषधोपचार उपलब्ध होत नव्हते. मात्र आता कधीही रात्री अपरात्री कलाकार, तंत्रज्ञ यांना रुग्णवाहिकेची  गरज पडली तर या रुग्णवाहिका मोफत उपलब्ध होणार आहेत. रंगभूमी आणि चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ यांना संतोष चव्हाण यांनी उपलब्ध करून दिलेली ही सोय निश्चितच फायदेशीर ठरेल, असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष  मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले. स्वर सर्वेश प्रोडक्शन आणि सर्वज्ञ नाट्य संस्था  यांच्या वतीने नाट्य, चित्रपट निर्माते संतोष चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संतोष चव्हाण, श्रावणी चव्हाण, विनोद खेडकर, अर्जुन जाधव आणि कलाकार,तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.

तेर ऑलिम्पियाड २०२२-२३' चे उदघाटन ,.देशभरातील ५ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

दैनंदिन जीवनात कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण हवे : प्रीती सावला  प्रेस मीडिया लाईव्ह : पुणे : तेर पॉलिसी सेंटरच्या 'तेर ऑलिम्पियाड २०२२-२३' चे उदघाटन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया ( आयसीएआय )  च्या सेंट्रल काउन्सिल मेंबर प्रीती सावला यांच्या प्रमुख उपस्थितीत   ऑनलाईन पद्धतीने २५ ऑगस्ट, गुरुवारी सायंकाळी ४ वाजता झाले. तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे,टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागाचे उप सरव्यवस्थापक रोहित सरोज,मयुरेश कुलकर्णी  उपस्थित होते. तेर ऑलिम्पियाड ही विद्यार्थ्यांसाठी  निसर्ग,विज्ञान,पर्यावरण रक्षण विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातात.या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.   यावेळी बोलताना प्रीती सावला म्हणाल्या,'संस्कारक्षम वयात पर्यावरण जागृतीचा विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचा  हा उल्लेखनीय उपक्रम आहे. सामाजिक योगदानासाठी नवीन पिढी सज्ज होत आहे,ही चांगली गोष्ट आहे.आपल्याला निसर्गाची आवश्यकता आहे. पुढील पिढ्यांसाठी त्याचे रक्षण केले पाहिजे,म्हणून कार्बन उत्सर्जनाची काळजी केली पाहि...