समाजवादी प्रबोधिनीच्या चर्चासत्रातील मत पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी ता.५,साहित्य आणि समाज यांचे परस्पर सबंध जिव्हाळ्याचे असेल पाहिजेत.त्यासाठी इतिहासाच्या वस्तुनिष्ठ मांडणी बरोबरच समकालीन प्रश्नांची चर्चा आणि त्याच्या सोडवणुकीची दिशा साहित्यातून समाजाला दिली गेली पाहिजे. साहित्यातून राजकीय ,सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक पर्यावरणाचा समतोल राखला जाणे फार महत्वाचे असते. सकस साहित्य हे सहीत नेणारे असते. ते वैश्विक आणि मानवतावादी असते. धर्म आणि राजकारण यांच्या सरमिसळी प्रमाणेच साहित्य आणि संकुचित राजकारण यांची सरमिसळही सामाजिक ,सांस्कृतिक एकतेला बाधा पोहोचवून अध:पतनाकडे नेत असते. याचे भान साहित्य निर्मिती व साहित्य व्यवहारांतून ठेवले गेले पाहिजे. जात ,पात, धर्म ,पंथ या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून विचार आणि त्याच्या उत्थानाची मांडणी साहित्यातून झाली पाहिजे. साहित्यातील वास्तविकता आणि काल्पनिकता याचा अनुबंध माणूस जोडण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतो. सुदृढ समाज बांधणीचे काम साहित्यातून अभिप्रेत असते ,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. वर्ध...