Skip to main content

Posts

Showing posts from March 1, 2023

कोण होणार चिंचवडचा आमदार...? आज जाहीर होणार

  चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ  पोटनिवडणुकीची आज मतमोजणी पुणे मेट्रो लाईव्ह : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण :  मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल....

आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, .संजय राऊत

  आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, .संजय राऊत पुणे मेट्रो लाईव्ह : मुरलीधर कांबळे :  कोल्हापूर : आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, त्यामुळे या टेस्ट ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले की, जे महानाट्य सुरू केलेय ते यशस्वी होणार आहे. खासदार संजय राऊत शिवगर्जना मेळाव्यातून पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला. संजय पवार महाराष्ट्राला शिवसेनेवरच्या निष्ठेसाठी माहीत आहेत. आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, त्यामुळे या टेस्ट ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले की, जे महानाट्य सुरू केलेय ते यशस्वी होणार आहे. कोल्हापूरची भूमी परिवर्तन करणारी भूमी आहे. बाळासाहेबांची महानता मोठी होती. त्यांनी माकडाची माणसे केली, माणसांचे सरदार केले आणि यातील काहींनी खंजीर खुपसला. या लोकांनी आपल्या आईला विकले. जे महाराष्ट्र आणि शिवसैनिक विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, संजय राऊत संपूर्ण देशाला माहीत आहेत हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. दिशा देण्यासाठी बा...