Skip to main content

Posts

Showing posts from August 31, 2022

मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर होणारी कोंडी सोडविण्यात बाजार समिती आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला यश

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : सणासुदीत  मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर होणारी कोंडी सोडविण्यात बाजार समिती आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला यश आले. गजबजलेल्या शिवनेरी रस्त्यावर दुतर्फा बेकायदा किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच दिवाळीत मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर फुले, पूजा साहित्य विक्री करणारे विक्रेते ठाण मांडतात. किरकोळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे शिवनेरी रस्त्यावर कोंडी होती. सातारा रस्त्यावरील उत्सव हॉटेल चौक ते मार्केट यार्डातील मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ठिकठिकाणी कोंडी होती. बाजारात खरेदीसाठी आलेल्या खरेदीदारांना कोंडीत अडकून पडावे लागते. शिवनेरी रस्त्यावरील अतिक्रमणांवर बाजार समिती आणि महापालिका प्रशासनाने यापूर्वी कारवाई केली होती. कारवाईत सातत्य ठेवल्याने यंदा गणेशोत्सवात शिवनेरी रस्त्यावरील कोंडी सोडविण्यात यश आले, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. उत्सव हॉटेल ते मार्केट यार्डातील टपाल कार्यालय चौकापर्यंत वाहनचालकांना सणासुदीच्या काळात ...

गणपती विसर्जनापर्यंत वाहतूक व्यवस्थेत दहा दिवस तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला

पुणे मेट्रो लाईव्ह : पूणे : शहराचा  वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यात करोनामुळे दोन वर्षे बाप्पाचा उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव धुमधडाक्‍यात साजरा होणार हे निश्‍चित. त्यातच भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार. यापूर्वी शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्‍वभुमीवर सुरक्षेची उपाययोजना तसेच वाहतूक कोंडी यामुळे विविध रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. दि.एक सप्टेंबरपासून गणपती विसर्जनापर्यंत वाहतूक व्यवस्थेत दहा दिवस तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपातील बदल दुपारी तीन ते गर्दी संपेपर्यंत हा बदल राहिल. तात्पुरत्या स्वरूपातील वाहतूक बदल : शिवाजीनगरवरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी – स. गो. बर्वे चौक-जे. एम. रोड-अलका चौक-टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा किंवा सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक – बोल्हाई चौक मार्गे नेहरु रोडचा वापर करुन स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. गर्दीची परिस्थीती पाहून पीएमपीएमएल बसेस या वरीलप्रमाणे वळविण्यात येतील. चा...