पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा!! गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः!! तस्मै श्री गुरवे नमः !! आज व्यासपोर्णिमा त्यालाच आपण गुरुपौर्णिमा असेही म्हणतो.भारत अर्थात हिंदुस्थान म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील जागतिक मार्गदर्शक देश! अवघ्या विश्वाला वेद, उपनिषद, रामायण,महाभारत,भगवत गीता, म बसवेश्वरांचे व शरणांचे वचन, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदायातील विविध संतांचे अभंग, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने तयार केलेले संविधान, विविध साहित्यिकांनी लिहिलेले साहित्याद्वारे ज्ञानाचा भांडार खुला करणारा विश्वगुरु म्हणजे हिंदुस्थान!! याच भुमीत अनेक साधुसंत,महर्षी जन्माला आले म्हणूनच आपल्या देशाला देवभुमी असेही म्हंटले जाते. आज सर्व प्रकारच्या गुरुंना वंदन करण्याचा दिवस!! आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गुरुपरंपरा या देशात उदयास आल्या. याच गुरुपरंपरेतील एक महान गुरु म्हणजेच चालता बोलता देव अशी ज्यांची ख्याती होती ते ज्ञानयोगी परमपुज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी होय. श्री सिद...