नागरिकांची मागणी ; सागर लांगे यांचा सातत्याने पाठपुरावा पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख देहूरोड कॉंटमेंट बोर्ड ऐवजी नगरपरिषद होण्याबाबत मागील सहा महिन्यापूर्वी सागर कृष्णा लांगे (भाजप प्रणित: नवभारतीय शिव वाहतूक संघटना, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय सर्वसामाजिक संस्था धार्मिक संघटना व देहूरोड मधील सर्व नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन, विद्यमान मुख्यमंत्री, देहूरोड कँटोन्मेंट बोर्डा चे कार्यकारी अधिकारी स्थानिक खासदार श्रीरंग आप्पा बारणे स्थानिक आमदार तसेच शासकीय संबंधित खात्याचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते व त्याचा सागर लांगे , यांचे सहकारी यांच्या माध्यमातून वेळोवेळी सर्वांकडे पाठपुरावा करत आहेत मा. अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग, भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली रंगशारदा सभागृह मुंबई या ठिकाणी *हर घर तिरंगा अभयानाअंतर्गत* कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये देहूरोड कॉंटमेंट बोर्डचे रूपांतर नगरपरिषदे मध्ये होण्याकरता कार्यक्रमांमध्ये उपस्थित ...