पुणे मेट्रो लाईव्ह : राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा विभाग असलेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाला आता हक्काची इमारत मिळणार आहे. विधानभवनासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या शेजारील जागेत राज्याचे “नोंदणी व मुद्रांक भवन’ उभारले जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक भवनाची इमारत आठ मजली असून, 5 हजार 100 चौरस मीटर इतके बांधकाम आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून, 18 महिन्यांत बांधकाम पूर्ण होणार आहे. शुक्रवारी (दि. 2) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. पुणे : नोंदणी व मुद्रांक विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलावरून राज्याच्या विकास कामांना निधी मिळतो. मागील आर्थिक वर्षात नोंदणी विभागाने सुमारे 35 हजार कोटींचा महसूल शासनाला जमा करून दिला होता. मागील अनेक वर्षांपासून नोंदणी भवन साकारण्याचे प्रयत्न सुरु होते. मागील दोन वर्षांत या विषयाला अधिक गती मिळाली आणि नोंदणी भवनसाठी नवीन प्रशासकीय इमारती शेजारील जागा देण्यास शासनाने मान्यता दिली. नोंदणी महानिरीक्षक यांचे कार्यालय सुर...