बेडकिहाळ येथे प्रभाग ७ ८ व ९ येथे विकास कामाना प्रारंभ. गोपाळदादाचे स्वप्नपूर्ती होणारच . पुणे मेट्रो लाईव्ह : बेडकिहाळ, ता,20- ग्राम पंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून प्रभाग क्रमांक ७, ८, व ९ येथे मूलभूत सार्वजनिक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सीसी गटार योजनेसाठी २१ लाख व सिद्धार्थ नगर भागात जल शुद्धीकरण घटक कामासाठी ३ लाख ४० हजाराचा भरीव निधी तरतूद करण्यात आला असून या कानांचा शुभारंभ रविवार (ता १९) रोजी सिद्धार्थ नगर परिसरात युवा नेते दत्तकुमार पाटील, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सहकार्यदर्शी प्रमोदकुमार पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. जेसीबी यंत्राचे पूजन ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा सविता पाटील, उपाध्यक्षा महादेवी यादव, सदस्या विद्या देसाई, सुवर्णा बत्ते, आशामा मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले तर जेष्ठ कार्यकर्ते ग्राम पंचायत माजी अध्यक्ष शंकर पाटील, युवा नेते ग्राम पंचायत सदस्य दत्तकुमार पाटील, तालुका पंचायत माजी सदस्य चांद मुल्ला, ताजुद्दिन मुल्ला, अ...