सुरेश भट यांनी गझलविधेला सामाजिक भान दिले प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर यांचे प्रतिपादन पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर ता.२६, गझल लेखनामध्ये तंत्रशरणता आणि तंत्रशुद्धता यांच्यामधली सीमारेषा ओळखता आली पाहिजे आपल्याला अभिप्रेत असलेला आशय तंत्रात बांधण्याचे कौशल्य गझलकाराकडे असले पाहिजे. हे चिंतन लोकाभिमुख असले पाहिजे. माधव जुलियन यांची कविता ही उत्तम कविता आहे. पण मराठीमध्ये शास्त्रशुद्ध गझलेचा पाया सुरेश भट यांनी घातला.तसेच आपल्या गझलेद्वारे मोठ्या प्रमाणावर सामाजिकतेचे भान दिले. तो पुरोगामी विचार आणि वारसा मराठी गझलेने आजच्या अस्वस्थ वर्तमानात अधिक ताकदीने पुढे नेला पाहिजे, असे मत मराठी गझलेचे पहिले संशोधक व गझलकार प्रा.डॉ.अविनाश सांगोलकर यांनी व्यक्त केले. ते गझलसाद संस्थेच्या वतीने लोकराजे शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या ' अविनाशपासष्ठी 'या कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी सुभाष नागेशकर यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमांमध्ये डॉ.सांगोलेकर यांनी गझलवि...