Skip to main content

Posts

Showing posts from October 15, 2022

पुणे : महानगरपालिकेच्या तब्बल 17 हजार कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी 'डबल धमाका' ठरली

  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : महानगरपालिकेच्या तब्बल 17 हजार कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी 'डबल धमाका' ठरली आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात सातव्या वेतन आयोगाचा फरक जमा करण्यास सुरूवात केली आहे.पुढील दोन दिवसांत बोनस आणि बक्षिसाची रक्कमही जमा केली आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. कायमस्वरुपी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा प्रश्‍न मार्गी लागला असला, तरी पालिकेत रोजंदारीवर असलेले तसेच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस देण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली असून याबाबत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका प्रशासन आणि मुखसभेने वर्षभरापूर्वी सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार, पाच टप्प्यांत हा फरक दिला जाणार होता. मात्र, तांत्रिक बाबीमुळे आयुक्तांनी आदेश देऊनही फरकाचा पहिला हप्ता देण्यात आलेला नव्हता. त्यातच, दिवाळी आठवडयाभरावर आली तरी अद्याप बोनस तसेच बक्षिसाची रक्कमही देण्यात आलेली नसल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या.