एकाच दणक्यात संपुर्ण वाहतूक विभागातील बदल्या केल्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित राखण्यासह वाहतूक विभागावरही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार त्यांच्या आदेशाप्रमाणे वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी विभागातील 31 पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षकांच्या झटक्यात अंतर्गत बदल्या केल्या आहेत. एकाच दणक्यात संपुर्ण वाहतूक विभागातील बदल्या केल्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. वाहतूक विभागातील काही अधिकारी मागील काही महिन्यांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून आले होते. विशेषतः परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात नव्हते. त्यामुळे संबंधितांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. वारंवार वाहतूककोंडी संदर्भात तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे यांना अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.5) वाहतूक विभागातील 31 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नवनियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी वाहतूककोंडी सोडविण्यावर भर दे...