Skip to main content

Posts

Showing posts from August 5, 2022

निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति...

 " अभिज्ञा  म्हणाली बाबा म्हणून मोठया प्रमाणात झाडं लावली पाहिजे"            कव्हर स्टोरी....       एका लहान मुलीची पर्यावरणाच्या  प्रती उत्तम कामगिरी अन्वरअली शेख पुणे मेट्रो लाईव्ह  देहूरोड दि.६ निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति प्रेम भावना व निसर्ग निर्मितीच्या महान कार्यात मग्न अशी ही देहूरोड शहराच्या केंद्रीय विद्यालय नंबर १.तिसरी  मध्य शिकत असताना पर्यावरणाची काळजी घेतली आणि पर्यावरण संवर्धन, निसर्ग रक्षणाच्या बाबतीत,तेसच मानवतेच्या दृष्टीकोनातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिला (नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थने ) कार्याची दखल घेऊन कु.अभिज्ञा पंकज तंतरपाळे यांना संस्थच्या वतीने प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे.   कु अभिज्ञा ची निसर्ग प्रति प्रेमाची कहाणी मागील दोन वर्षांपूर्वी जन्माला आली संपूर्ण जग कोरोना या भयंकर महामारी-शी झुंजत होता भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती,अनेक निष्पाप लोकं या आजारा मुळे मरण पावले,र...

हर घर मे तिरंगा आणि देश प्रेम

पुणे मेट्रो लाईव्ह : आजादी का अमृत महोत्सव  अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022  प्रत्येक घर ,ऑफीस ,शाळा सगळ्या ठिकाणी तिरंगा उभारण्यासाठी घर घर  तिरंगा अभियान चालवण्यात येत आहे त्याबद्दल काही गोष्टी मला मनापासून वाटतात .त्या आपल्या सोबत शेअर करत आहे .  घर घर तिरंगा याअंतर्गत प्रत्येक घर ,ऑफिस, शाळा या ठिकाणी तिरंगा आपण फडकवणार आहोत पण ह्या तिरंग्याचा अभिमान फक्त दोन दिवसासाठी आहे का ? आणि दोन दिवसानंतर म्हणजे 16 ऑगस्टला त्या तिरंग्याचे काय होणार?  काही तिरंगे हे कागदी असतील, काही तिरंगे हे प्लास्टिकचे असतील, काही तिरंगे हे कापडाचे असतील पण दोन दिवसांचे अभियान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी ह्या तिरंग्याच काय होणार..? तर मला असे वाटते की ...दोन दिवसाचे घर घर तिरंगा अभियान झाल्यानंतर पुढे तो तिरंगा रस्त्यावर फेकला जाऊ नये, तिरंगा कोणाच्या पाया खाली येता कामा नये .तिरंग्याचा अवमान होता कामा नये असे मला वाटते .त्यामुळे घर घर तिरंगा ठीक आहे पण प्रत्येक घराघरातील माणसाच्या मनामध्ये तुम्ही तिरंगा कसा फडकवणार ?फक्त दोन दिवस घरावरती तिरंगा फडकवून खरंच देशप्रेमाची ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील 23 महापालिका

  निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभागरचना व आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली. पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २३ महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभाग रचना व आरक्षण सोडतीबाबत झालेली सर्व प्रक्रिया रद्द करण्यात यावी. जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत तोपर्यंत निवडणूक संदर्भात कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेली असून निवडणुकीची प्रभागरचना व आरक्षण सोडत नव्याने करण्यात याव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्य प्रभागरचना केली होती. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयाच्या कचाट्यात आडकल्यानंतर ओबीसींना वगळून आरक्षण जाहीर करण्यात आले. राज्यात सत्तांतर होताच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाचे व महिलांचे आरक्षण रद्द करण्यात आले. ओबीसींचा समावेश करून नव्याने सोडत ...

बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे आता 'ररा' लघुपटात

  महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध 'ररा' हिंदी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे:सद्ध्याच्या घडीला महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार प्रमाण पाहता प्रत्येक मुलीच्या अंगात राजमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले, माता रमाई, झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर संचारणे ही काळाची गरज आहे.तरच आज महिला आणि मुली सुरक्षित राहू शकतात. याच विषयांवर आधारित शिवगर्जना Creations प्रस्तूत सचिन गवळी लिखित/दिग्दर्शित 'ररा'ही हिंदी शॉर्ट फिल्म बनवत आहेत. या शॉर्ट फिल्म मध्ये बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे, बालकलाकार पार्श्र्वी आणि सचिन गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तसेच गणेश शेजवळ, स्वप्नील गुडेकर, मच्छिंद्र बोरगुडे आणि यश जगताप हे सहकलाकार आहेत.कॅमेरा सचिन केदारी, केतन चिकणे तर प्रॉडकशन ची जबाबदारी निखिल खांदवे, अभय पोते, स्नेहलराज कारंडे, प्रणाली साबळे तसेच मेक अप नवीन परमार आणि शिवाजी गोडे यांनी केला.लवकरच 'ररा'ही हिंदी शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

विद्युत वाहिनीचा खांब वाहतुकीला व नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या या खांबाला स्थलांतरित करण्यात पंकज तंतरपाळे यांना यश

पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख देहूरोड दि ५. शहराच्या छावणी परिसरातील वार्ड क्रमांक चार बँक ऑफ इंडिया श्री कृष्ण नगर ते एम बी कॅम्प या रोड वर मधोमध विद्युत वाहिनीचा खांब कित्येक वर्षा पासुन वाहतुकीला अडथळा निर्माण करत होता, त्या ठिकाणी अपघातही घडत होते, चालकांना त्या ठिकाणी नेहमीच कवायत करावी लागत असे, स्थानिक नागरिक व रस्त्याने पायदळ ये-जा करणारे वय-वृद्ध व्यक्ती अथवा अन्य सामान्य नागरिकांना त्रासदायक असा हा खांब,रोडच्या मधोमध असलेला विद्युत  वाहिनीचा खांब अनेक वर्षापासून रोडच्या मध्यभागी उभा होता, किती वेळा उंच गाड्या त्या ठिकाणी विद्युत वाहिनी खांबाला धडकून अपघात घडले,  त्यामुळे स्थानिक वस्तीत वीज खंडित होत असे.हा त्रास नेहमीचाच होता, अनेक राजकीय व्यक्ती कार्यकर्ते येथून ये जा करत असतात, परंतु हा खांब सर्वांची नजर चुकावून सर्वसामान्य जनतेला व रस्त्यावरील वाहन चालकांना त्रासदायक ठरत होता, परंतु सामान्य जनतेसाठी सदैव प्रयत्न करणारे आणि झटणारे युवा नेते पंकज तंतरपाळे यांच्या बारीक व दूरदृष्टी पासून हा खांब स्वतःला वाचवू शकला नाही, रावेत डिव्हिजन महावितरण विभाग यांना सतत पाठपु...

जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

  प्रेस मीडिया लाईव्ह :  पुणे दि.५: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान  राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ यांच्याद्वारे जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.        ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त घरोघरी तिरंगा फडकवावा यासाठी अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तशी विक्री केंद्रेही विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने बचतगटातील महिला भगिनींनी तिरंगा ध्वज  विक्री उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी या केंद्रावरून ध्वज घ्यावा आणि प्र...