विद्युत वाहिनीचा खांब वाहतुकीला व नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या या खांबाला स्थलांतरित करण्यात पंकज तंतरपाळे यांना यश
पुणे मेट्रो लाईव्ह
अन्वरअली शेख
देहूरोड दि ५. शहराच्या छावणी परिसरातील वार्ड क्रमांक चार बँक ऑफ इंडिया श्री कृष्ण नगर ते एम बी कॅम्प या रोड वर मधोमध विद्युत वाहिनीचा खांब कित्येक वर्षा पासुन वाहतुकीला अडथळा निर्माण करत होता, त्या ठिकाणी अपघातही घडत होते, चालकांना त्या ठिकाणी नेहमीच कवायत करावी लागत असे, स्थानिक नागरिक व रस्त्याने पायदळ ये-जा करणारे वय-वृद्ध व्यक्ती अथवा अन्य सामान्य नागरिकांना त्रासदायक असा हा खांब,रोडच्या मधोमध असलेला विद्युत वाहिनीचा खांब अनेक वर्षापासून रोडच्या मध्यभागी उभा होता, किती वेळा उंच गाड्या त्या ठिकाणी विद्युत वाहिनी खांबाला धडकून अपघात घडले, त्यामुळे स्थानिक वस्तीत वीज खंडित होत असे.हा त्रास नेहमीचाच होता, अनेक राजकीय व्यक्ती कार्यकर्ते येथून ये जा करत असतात, परंतु हा खांब सर्वांची नजर चुकावून सर्वसामान्य जनतेला व रस्त्यावरील वाहन चालकांना त्रासदायक ठरत होता, परंतु सामान्य जनतेसाठी सदैव प्रयत्न करणारे आणि झटणारे युवा नेते पंकज तंतरपाळे यांच्या बारीक व दूरदृष्टी पासून हा खांब स्वतःला वाचवू शकला नाही, रावेत डिव्हिजन महावितरण विभाग यांना सतत पाठपुरावा करत जबाबदारीने या विषयावर लक्ष केंद्रित करून हा जनतेला भेडसावणारा प्रश्न पंकज यांनी मार्गी लावला अर्थात या खांबाला रस्त्याच्या मध्यभागातून स्थलांतरित करून रस्त्याच्या एका बाजूला लावण्यात आज यश प्राप्त झाले. पंकज तंतरपाळे यांनी सतत हा प्रश्न उचलून धरल्यामुळे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी या कामाला आज मार्गी लावले, त्यामुळे वाहन चालक व स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला,
या विषयाला अनुसरून पंकज तंतरपाळे यांचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment