गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको पुणे मेट्रो लाईव्ह : प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे.मानवी संस्कृती गुरुचे महत्व नेहमीच अन्यासाधरण राहिलेले आहे. जीवनात मार्गक्रमण करत असताना समस्यांना भिडण्यासह जीवन जगण्याची कला गुरु शिकवत असतात. भारतीय दर्शन परंपरेत आणि संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानलेले आहे. बालकाचे पहिले गुरु हे त्याचे आई-वडील असतात. मात्र त्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरु कारणीभूत ठरत असतो व प्रेरणादायी ठरत असतो. एक चांगला नागरिक बनवण्याचे काम गुरु आपल्या संस्कारातून करत असतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः अशी गुरुची व्याख्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरूंच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्य...