Skip to main content

Posts

Featured Post

लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित

लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित  पुणे मेट्रो लाईव्ह :  जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची त्रयस्त तपासणी चौकशी करून तपासणीचा अहवाल.पंधरा दिवसांमध्ये  देण्याचे व अहवालामध्ये कामाबाबत काही गंभीर त्रुटी निदर्शनास आलेस ठेकेदारावर निविदा अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र करवीर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे यांना दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांनी केली .   यावेळी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष अॅड . मुकुंद सनदे उपस्थित होते या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजय इंगळे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख  समीर विजापुरे इचलकरंजी महानगर जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दातार आधी सहभागी होते
Recent posts

पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे करवीर पंचायतीसमोर उपोषण आंदोलन

  पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे करवीर पंचायतीसमोर उपोषण आंदोलन पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर प्रतिनिधी :  जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचारातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करा या मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंगराव कांबळे ,कोल्हापूर जिल्हा महानगर अध्यक्ष अॅड . मुकुंद सनदे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा वाजले पासून उपोषण सुरू करण्यात आले . जल जीवन मिशन अंतर्गत बोलोली तालुका करवीर येथे काम सुरू आहे सध्या या गावांमध्ये पाईपलाईन टाकल्यात आले आहेत व त्याच्या बिलांची उचल ही केली आहे तसेच म्हारुळ तालुका करवीर या गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आलेली आहेत निविदा कागदपत्राप्रमाणे पाईपलाईन टाकण्यात आलेले नाही मुरूम बिडींग डॉक्युमेंट प्रमाणे पाईपलाईनची डेप्थ किती पाईपलाईन टाकण्यात आली याची नोंद एमबी मध्ये दाखवण्यात आले आहेत त्या सर्व स्पॉट वरती दाखवण्यात यावीत व या कामातील भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार उपअभियंता शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे तसेच ठ...

गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको

  गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको पुणे मेट्रो लाईव्ह : प्रसाद माधव कुलकर्णी  (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com    सोमवार ता. ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे.मानवी संस्कृती गुरुचे महत्व नेहमीच अन्यासाधरण राहिलेले आहे. जीवनात मार्गक्रमण करत असताना समस्यांना भिडण्यासह जीवन जगण्याची कला गुरु शिकवत असतात. भारतीय दर्शन परंपरेत आणि संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानलेले आहे. बालकाचे पहिले गुरु हे त्याचे आई-वडील असतात. मात्र त्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरु कारणीभूत ठरत असतो व प्रेरणादायी ठरत असतो. एक चांगला नागरिक बनवण्याचे काम गुरु आपल्या संस्कारातून करत असतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा  गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः अशी गुरुची व्याख्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरूंच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्य...

श्री गुरु ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजी... गुरुपरंपरेतील एक मानबिंदु: डॉ कुमार पाटील

  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे  गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा!!  गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः!! तस्मै श्री गुरवे नमः !! आज व्यासपोर्णिमा त्यालाच आपण  गुरुपौर्णिमा असेही म्हणतो.भारत अर्थात हिंदुस्थान म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील जागतिक मार्गदर्शक देश! अवघ्या विश्वाला वेद, उपनिषद, रामायण,महाभारत,भगवत गीता, म बसवेश्वरांचे व शरणांचे वचन, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदायातील विविध संतांचे अभंग, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने तयार केलेले संविधान, विविध साहित्यिकांनी लिहिलेले साहित्याद्वारे ज्ञानाचा भांडार खुला करणारा विश्वगुरु म्हणजे हिंदुस्थान!!  याच भुमीत अनेक साधुसंत,महर्षी जन्माला आले म्हणूनच आपल्या देशाला देवभुमी असेही म्हंटले जाते. आज सर्व प्रकारच्या गुरुंना वंदन करण्याचा दिवस!! आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गुरुपरंपरा या देशात उदयास आल्या. याच गुरुपरंपरेतील एक महान गुरु म्हणजेच चालता बोलता देव अशी ज्यांची ख्याती होती ते ज्ञानयोगी परमपुज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी होय. श्री सिद...

पुण्यातील परदेशी विद्यार्थ्यांनी साजरी केली बकरी ईद!

  आझम कॅम्पस मध्ये अत्तर, गुलाब, चॉकलेट वाटप पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या   परदेशी विद्यार्थ्यानी बुधवारी २८ जुन रोजी आझम कॅम्पस येथे  बकरी ईद ( ईद-अल-अधहा ) साजरी केली.भारतातील ईदच्या एक दिवस आधी  परदेशातील चंद्र दर्शनाच्या वेळापत्रकाप्रमाणे ही ईद २८ जुन  रोजी साजरी करण्यात आली.  बुधवारी सकाळी साडेसात वाजता अरब, आखात ,येमेन ,सुदान ,इराण ,सौदी अरेबिया,अफगाणिस्तान  आणि अनेक देशातील  सुमारे १ हजार विद्यार्थी आझम कॅम्पस मशिदीमध्ये  नमाज पठणासाठी एकत्र आले. विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र नमाज पठणाची व्यवस्था करण्यात आली होती.नमाज पठण केल्यानंतर सर्वानी  प्रेमाने एकमेकांच्या  भेटी घेतल्या.  त्यानंतर या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प ,अत्तर, चॉकलेट देण्यात आले.या विद्यार्थ्यांनी  एकमेकांसमवेत फोटो काढण्याचा, सेल्फीचा आनंद लुटला आणि घरच्यांना लगोलग सोशल मीडियाद्वारे ख्याली खुशाली कळवली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  तसेच 'डॉ. पी. ए. इनामदार  युनिव्हर्सिटी' चे कुलपती डॉ.पी...

सुरेश भट यांनी गझलविधेला सामाजिक भान दिले-- प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर यांचे प्रतिपादन

सुरेश भट यांनी गझलविधेला सामाजिक भान दिले प्रा.डॉ.अविनाश सांगोलेकर यांचे प्रतिपादन पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर ता.२६, गझल लेखनामध्ये तंत्रशरणता आणि तंत्रशुद्धता यांच्यामधली सीमारेषा ओळखता आली पाहिजे आपल्याला अभिप्रेत असलेला आशय तंत्रात बांधण्याचे कौशल्य गझलकाराकडे असले पाहिजे. हे चिंतन लोकाभिमुख असले पाहिजे. माधव जुलियन यांची कविता ही उत्तम कविता आहे. पण मराठीमध्ये शास्त्रशुद्ध गझलेचा पाया सुरेश भट यांनी घातला.तसेच आपल्या गझलेद्वारे मोठ्या प्रमाणावर सामाजिकतेचे भान दिले. तो पुरोगामी विचार आणि वारसा मराठी गझलेने आजच्या अस्वस्थ वर्तमानात अधिक ताकदीने पुढे नेला पाहिजे, असे मत मराठी गझलेचे पहिले संशोधक व गझलकार प्रा.डॉ.अविनाश सांगोलकर यांनी व्यक्त केले. ते गझलसाद संस्थेच्या वतीने लोकराजे शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या ' अविनाशपासष्ठी 'या कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी सुभाष नागेशकर यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमांमध्ये डॉ.सांगोलेकर यांनी गझलवि...

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा

  श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा इचलकरंजी : प्रतिनिधी :   21 जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन साजरा करण्यात आला.  प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी योगदिनाचे महत्त्व विषद केले. यावेळी राज्यस्तरीय योगासनपटू कु. हर्षदा करंबेळकर, कु. शर्वरी माळी व त्यांच्या सहकारी विद्यार्थिनींनी प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासने अशा क्रमाने प्रात्यक्षिके करीत उपस्थित मुलींकडून आसने करवून घेतली. यामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर तसेच उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, एस. व्ही. पाटील हे सारे स्वतः सहभागी झाले व त्यांनी सर्व योगासनेही केली. काही शिक्षक-शिक्षिकांनीही योगासने केली.  सौ. अर्चना रानडे यांनी कार्यक्रमाला साजेसे गीत सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाविभाग प्रमुख प्रा. शेखर शहा यांच्या नेतृत्वाखाली योगदिन प्रमुख आर. पी. कुलकर्णी यांनी केले.

जमीयत उलमा हिंद महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी साहब का इंतकाल

आजमी साहब की कमी हमेशा मेहसुस होगी ; हाजी गुलजार अध्यक्ष जमीयत पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो लाईव्ह :    अन्वरअली शेख  :  पिंपरी चिंचवड- जमियेत उलमा हिंद  महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी | साहब का कल  २० जून को सुबह की नमाज से कुछ वक्त पहले इंतकाल हो गया.  जनाजे की नमाज असर के बाद  नारियलवाडी कब्रस्तान मुंबई में अदा की गयी और उसी कब्रस्तान में सुपुर्द खाक किया गया. हजरत मौलाना मुस्तकीम साहब सदर महाराष्ट्र जमीयत के साथ समाजसेवा में ५६ साल से लगे रहे और आप उलेमाये दिन में एक बेहतरीन मुकर्रार थे. आपके पुणे शहर मे कई सफर हुवे हे. जमियेत के लिये आप का बहुत महत्व पूर्ण योगदान रहा है, आप जमीयत उलेमा के प्रोग्राम में २५-३० वर्षो से जुडे रहे. हाजी गुलजार अध्यक्ष पिंपरी चिंचवड जमियेत उलमा ने आपके इंतकाल पर दुख व्यक्त किया है और अल्लाह से दुआ कि है कि मरहूम को जन्नते फिरदौस आला मकाम अता फरमाएं.  

खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची भेट घेतली

प्रसंगी कायदेशीर मदत करू असे आश्वासन खासदार सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना दिले.   पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची रात्री नऊ वाजता  भेट घेतली. आंदोलन स्थळावरून त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.  शिक्षकांच्या या आंदोलनात मी शेवटपर्यंत सोबत राहीन  ही एक सामाजिक लढाई आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणी करीता प्रसंगी कायदेशीर मदत करू असे आश्वासन खासदार सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना दिले.  या आंदोलन करणाऱ्या मध्ये  महिला शिक्षिका आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांसोबत संवाद साधताना अनेक महिला शिक्षकांना अश्रू अनावर झाले. रामाचाही वनवास 14 वर्षानंतर संपला होता. मग आमच्यावरच अन्याय का, मला न्याय मिळवून द्या. अन्यथा उपोषणाची लढाई आणखी तीव्र करू, अशा भावना यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी खासदार सुळे यांच्यासमोर व्यक्त केल्या.पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील 93 शिक्षक महापालिका सेवेत का...

पुणे मनपाच्या प्राथमिक शाळेत गेल्या चौदा वर्ष मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने व्हावी .. शिक्षक प्रकाश शिंदे .  पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे मनपाच्या प्राथमिक शाळेत गेल्या चौदा वर्ष मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांनी काल पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उच्च न्यायालयाने या शिक्षकांना सेवेत कायम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयीन आदेशाची महापालिका प्रशासनाने चार महिन्यानंतरही अंमलबजावणी न केल्याने शिक्षकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.  पुणे महानगरपालिके मध्ये 2009 आणि 2011 या वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने रजा मुदत शिक्षण सेवक म्हणून ही शिक्षक भरती करण्यात आली होती. पुढे 2017 मध्ये या शिक्षकांना सेवेत कायम करायला राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने आदेश दिले होते ,  मात्र त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. या विरोधात प्रकाश शिंदे आणि इतर शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 93 शिक्षकांना सेवेत कायम करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश फेब्रुवारी 2023 मध्ये  महापालिकेस दिले.  पुणे महापालिकेस या साठी सहा आठवड्यांची ...