गेल्या 24 तासात पावसाच्या नोंदी या 100 मिलिमीटरपेक्षा अधिक आहे. पुणे मेट्रो लाईव्ह : गेल्या चार दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने चांगला कहर केला आहे. 500 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेले आहे . गेल्या 24 तासात पावसाच्या नोंदी या 100 मिलिमीटरपेक्षा अधिक आहे. राळेगाव तालुक्यातील राळेगाव मंडळात पावसाने रेकॉर्ड मोडला असून 24 तासात 175 मिमी पाऊस झाला. तर त्यामुळे या भागातील शेतात पाणी साचले असून शेकडे एकर वरील पिके पाण्याखाली गेली. कापूस सोयाबीन हे पीक पाण्याखाली असल्याने शेतकरी हैराण झाला. शासकीय निकषाप्रमाणे 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास अतिवृष्टी जाहीर केला जाते. जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, वनी, मारेगाव, झारीजामनी या तालुक्यातील एकोणीस मंडळामध्ये सरासरी 100 मीमी पाऊस झाला आहे. तर एकट्या राळेगाव तालुक्यात 175 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. अचानक वाढलेला पावसाच्या जोराने अनेक भागात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर अनेक भागात रस्ते आणि छोटे पूल वाहून गेल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. पावसाचा हा जोर आणखी काही दिवस कायम राहिल असा अंदाज ह...