Skip to main content

Posts

Showing posts from July 9, 2022

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची कामे मार्गी लावण्याचे समाधान : विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, ता. १० : श्री विठ्ठलाच्या कृपेने सर्व जनता सुखी राहो, रुक्मिणी मातेच्या कृपाशीर्वादाने सर्व माता भगिनिंचा समाधानाने प्रवास होवो. सर्व वारकऱ्यांच्या वारीचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होवो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली आहे असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले. पुण्यातील सुप्रसिद्ध निवडुंग्या विठोबा मंदिरात आज त्यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या समवेत दर्शन घेतले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  त्या म्हणाल्या, ' पंढरपूर येथील रुक्मिणी मातेच्या चरणांची झालेली झीज पुरातत्व खात्याच्या सहकार्याने वज्रलेप करून घेता आली.  राज्य शासनाच्या माध्यमातून ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात वातावरण खेळते राहण्यासाठी एकझोस्त पंखे बसविण्याची आणि गाभाऱ्यात पावसाचे पाणी येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक योजना करण्याच्या सूचना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. पालखीच्या मार्गावरील ८० टक्के रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे ही समाधानाची बाब आहे. यामुळे मनाला एक वेगळे...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे विमानतळावर स्वागत

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, दि.९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी स्वागतासाठी  खासदार गिरीश बापट, आमदार तानाजी सावंत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.  प्रशासनाच्यावतीने पुणे विभागाचे अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण केले.

शब्दाला जागणारे सर्वसमावेशक नेतृत्व !

पुणे मेट्रो लाईव्ह : हल्ली राजकारणात शब्दाला जागणारे नेतृत्व अपवादानेच बघायला व अनुभवायला मिळते.याउलट सत्तेच्या स्वार्थासाठी जनतेचा विश्वासघात करणा-यांची माञ मोठी गर्दी आहे.त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा राजकारणा बरोबरच नेते मंडळींच्या प्रामाणिक कार्यावरील विश्वास कमी होत चालला आहे,हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही.असे असले तरी आपल्या प्रामाणिक जनहिताच्या कार्यातून राजकारणातून समाजकारण करता येते ,हे दाखवून देणारे माञ जनतेच्या मनात आदराचे भक्कम स्थान निर्माण करतात.अशा कार्यकुशल मंडळींना जनतेचे मिळणारे पाठबळ हीच त्यांची मोठी ताकद असते.याच ताकदीच्या बळावर व आपल्या प्रशासकीय कामकाजातील अनुभवी कौशल्याच्या जोरावर  ते प्रशासनाकडून समाजातील विविध प्रलंबित मुलभूत विकासकामे मार्गी लावण्यात कमालीचे यशस्वी ठरतात.याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे राजकारणात राहूनही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे झटणारे व सर्वसामान्यांचा आपला हक्काचा माणूस अशी सर्वमान्य विश्वासार्ह ओळख निर्माण केलेले वस्ञनगरीचे सुपूञ माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार.ते केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपचे समर्थक असले तरीही व...