भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा आणि ध्वजारोहण एम. बी कॅम्प देहूरोड मधे मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा
पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख देहूरोड: दि.१५ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा सोमवारी सर्वत्र मोठा उत्साह आणि जल्लोषात साजरा होत आहे. एम. बी. कॅम्प देहूरोड येथेही मलिक शेख युवा नेते काँग्रेस पक्ष असिफ सय्यद काँग्रेस पार्टी यांच्यासह मदद फाऊंडेशन देहूरोड याच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभास महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्चना राऊत पि. चिं. महिला उपाध्यक्ष रा.काँग्रेस पक्ष व माजी पोलीस अधिकारी अबू-बकर लांडगे, आयुब खान, सुनील तरस यांनी अर्पण केले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित विलास तरस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य कंपास, व खाऊ वाटण्यात आले.आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत मुन्ना कुरेशी यांनी केले तर सूत्रसंचालन अन्वरअली शेख यांनी केले, आलेल्या सर्व पाहुण्यांचे असिफ सय्यद यांनी आभार मानले त्यावेळी बापू कातळे भावी नगर सेवक ,राजेंद्र तरस भावी नगर सेवक, गफुर भाई शेख मुस्लिम समाजातील ज्येष्ठ विचारवंत,सोनू श...