Skip to main content

Posts

Showing posts from July 7, 2022

27 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

 कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 100 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे,  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.  आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 44.98 दलघमी, वारणा 414.18 दलघमी, दूधगंगा 255.21 दलघमी, कासारी 40.18 दलघमी, कडवी 29.86 दलघमी, कुंभी 38.95 दलघमी, पाटगाव 48.09 दलघमी, चिकोत्रा 20.50 दलघमी, चित्री 20.38 दलघमी, जंगमहट्टी 18.27 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, आंबेआहोळ 20.85, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.    तसेच बंधाऱ्यांची ...

महानगरपालिकेच्या एका मुख्य आरोग्य निरीक्षकाने अनुसूचित जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केली

निरीक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले  पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एका मुख्य आरोग्य निरीक्षकाने अनुसूचित जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्या निरीक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. सुनील वाटाडे हे त्या निरीक्षकाचे नाव आहे. ते महापालिकेचे 'फ' क्षेत्रीय कार्यालयात मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून काम करीत असून वाटाडे यांनी जात प्रमाणपत्र काढले. पुणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने जातीचा पहिला दाखला 6 सप्टेंबर 1997 ला अवैध ठरविला. ही बाब त्यांनी महापालिका प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवून फसवणूक केली आहे. तसेच अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच, त्यांच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. या प्रकरणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आरोग्य मुख्य कार्यालय आणि फ क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्तांकडे शिफारस अहवाल दिला आहे. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र जप्त आणि रद्द केल्याची बाब विचारात घेता त्यांची विभागीय चौकशी क...

स्मार्ट’प्रकल्पांतर्गत सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी महानगरपालिकेतर्फे जागा

पुणे : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यात ‘अर्बन फूड सिस्टिम’ राबविण्यात येत असून त्याअंतर्गत ग्राहकांपर्यंत सेंद्रीय आणि विषमुक्त शेतमाल पोहोचविण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत जागा व ओटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहरी बाजारपेठेत सेंद्रिय किंवा विषमुक्त शेतमालाची मागणी जास्त आहे. शहरी बाजारपेठेच्या मागणीनुसार सेंद्रीय किंवा विषमुक्त शेतमाल पुरवठा करावयाचा आहे. असा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘अर्बन फुड सिस्टीम’अंतर्गत आत्मा,  कृषी विभाग, पणन विभाग व पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत शेतकरी आठवडे बाजार, सुनियोजित किरकोळ बाजार, मिड डे मिल या संकल्पनेतील शाळांचे किचन व ओटा मार्केटच्या माध्यमातून प्राधान्यक्रमाने उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता पुणे महानगरपालिकेमार्फत जागा व ओटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विषमुक्त शेतमाल पिकवून पुणे शहरात स्वखर्चाने वाहतूक करुन विक्री करण्यास इच्छुक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटांनी यासाठी अर्ज सादर करावे. इच्छुकांनी अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष,...

अकिवाट येथे उद्या शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

   अकिवाट :  डॉ.व्यंकटेश पत्की व डॉ.प्रविण जैन यांचे "संजीवन हॉस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर युनिट, जयसिंगपूर"* यांच्या वतीने आपल्या अकिवाट गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत  पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्णांसाठी ठराविक आजारांच्या उपचारासाठी सोय संजीवनी हॉस्पिटल , जयसिंगपूर येथे उपलब्ध केली आहे.या संदर्भात जनजागरण व्हावे म्हणून हा शिबीर आयोजित केला आहे. या शिबिरात दम्याचे आजार, फुफ्फुसाचे आजार, लिव्हरचे आजार, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार यांची मोफत तपासणी होणार आहे. स्थळ :- "श्री" हॉस्पिटल,बस स्टॉण्ड जवळ अकिवाट वेळ :- शुक्रवार दिनांक ०८/०७/२०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी संपर्क :- विनोद आवटी 9975398236, इर्शाद नदाफ 9860888968

शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, व आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे :  शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ लोणकर यांच्यासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका मासे विक्रेत्याला दुकान बंद करण्यासाठी दबाव टाकत बाबर यांनी दादागिरी करत पोलिसांच्या मदतीने मारहाण केली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता . यांच्यावर गुन्हा दाखल - माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी कामथे, गरुड, नदाफ, सुब्बानवाड, सुरेखा बडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

गगनबावडा येथे काल 80.6 मिमी पाऊस

  पुणे मेट्रो लाईव्ह :  कोल्हापूर, दि. 7 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 80.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आज सकाळी 10.57 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.  जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 7 मिमी, शिरोळ -4.1 मिमी, पन्हाळा- 28.8 मिमी, शाहूवाडी- 24.6  मिमी, राधानगरी- 35.1 मिमी, गगनबावडा-80.6 मिमी, करवीर- 15.2 मिमी, कागल- 18 मिमी, गडहिंग्लज- 19.1 मिमी, भुदरगड- 44.3 मिमी, आजरा-42.5  मिमी, चंदगड- 32.3  मिमी  पाऊस पडल्याची नोंद आहे.

खालापूर तालुक्यातील हाळ गाव येथे श्री सदस्य यांनी केली वृक्ष लागवड

पुणे मेट्रो लाईव्ह : रायगड जिल्हा : सुनील पाटील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी खालापूरचे तहसीलदार अयुब तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हाळ गाव येथे वृक्ष लागवड करण्यात आली. श्री सदस्यांनी या भागात पिंपळ, निलगिरी, कडुलिंब, ताम्हण, करंज, अर्जुन, रिठा, गुलमोहर, ऑस्ट्रेलियन सुबाबुळ, बेहडा यांसारख्या वृक्षांची लागवड केल्याबद्दल तहसीलदारांनी कौतुक केले. दरम्यान आम्ही वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे संवर्धन करणार असल्याचे यावेळी श्री सदस्यांनी सांगितले. याप्रसंगी खालापूरच्या तहसीलदारांसोबत वन अधिकारी कर्मचारी व या भागातील श्री सदस्य उपस्थित होते. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करताना प्रत्येक सदस्य स्वतःजवळ असलेली पदवी विसरून सामाजिक कार्यास हातभार लावत असल्याचे पाहायला मिळत असून यामुळे अनेक ठिकाणी वनराई फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले. वृक्ष लागवड केल्याने पर्यावरणाचा ढासळलेला समतोल अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचे तहसीलदारांनी यावेळी सांगितले. वृक्षांची ला...