शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, व आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
पुणे मेट्रो लाईव्ह :
पुणे : शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ लोणकर यांच्यासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील एका मासे विक्रेत्याला दुकान बंद करण्यासाठी दबाव टाकत बाबर यांनी दादागिरी करत पोलिसांच्या मदतीने मारहाण केली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता .
यांच्यावर गुन्हा दाखल -
माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी कामथे, गरुड, नदाफ, सुब्बानवाड, सुरेखा बडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
Comments
Post a Comment