राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा सरचिटणिस दीपक गुप्ता यांची फ प्रभाग अधिकरी सीताराम बहुरे यांच्याकडे मागणी
पुणे मेट्रो लाईव्ह :
कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेश उत्सव साजरा करण्यात आला नाही. यावर्षी गणेश उत्सव प्रथमच निर्बंधमुक्त मोठ्या थाटामाटात गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशा परिस्थितीत चिखली येथील विसर्जन घाटाची स्वच्छता करून विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत , अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस दीपक गुप्ता यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे फ प्रभाग अधिकार सीताराम बहुरे यांच्याकडे केली आहे.
दीपक गुप्ता यांनी सांगितले की, चिखली परिसरातील सार्वजनिक घाटावरील असलेल्या कचरा तसेच राडारोडा काढून तो परिसर स्वच्छ करून या ठिकाणी फवारणी करून तो घाट स्वच्छ करावा. त्यामुळे येथे होणारी दुर्गंधी दूर होईल.
कोरोनामुळे दोन वर्षे गणेश उत्सव साजरा करण्यात आला नसल्यामुळे या वर्षी निर्बंधमुक्त गणेश उत्सव शहरात मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहेत.विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे केली आहे. पडलेले आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना विसर्जन घाटाकडे जाताना हे खड्डे धोखादायक अनुचित प्रकार घडू नये म्हणुन महापालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन हे खड़े दुरुस्त करावेत असेही गुप्ता यांनी मागणी
महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु गणेश उत्सव काळात शहरातील नागरिक व गणेश भक्त फुले, पूजा साहित्य मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे अशा वेळी महापालिकेने या भागात कचराकुंडी ठेवावी. त्यामुळे कचरा इतर कोठेही टाकला जाणार नाही. त्यामुळे परिसरही स्वच्छ राहील.
Comments
Post a Comment