Skip to main content

Posts

Showing posts from August 8, 2022

कोंढव्यातील सांस्कृतिक सभागृहे उघडण्यासाठी आंदोलन

  इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे उपायुक्तांना निवेदन  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : स्थानिक सर्व माजी नगरसेवकांच्या वर्चस्वाच्या लढाईत पुणे महानगरपालिकेने बंद केलेली  कोंढवा खुर्द येथील साईबाबा नगर आणि शिवनेरी नगर मधील सांस्कृतिक सभागृहे (फंक्शन हॉल)पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप आणि कोंढव्यातील नागरिकांनी पुणे महापालिकेसमोर आंदोलन केले आणि पालिकेच्या समाजकल्याण विभागाचे उपायुक्त आर.आर.चव्हाण यांना निवेदन दिले. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सोमवारी दुपारी करण्यात आले.   पालिकेने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि लग्न समारंभाकरीता शिवनेरीनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि साईबाबा नगर येथे इमाम अबू हनीफा नावाने सांस्कृतिक सभागृह (हॉल ) बांधण्यात आले आहेत. अल्प उत्पन्न गटातील नागरिक त्याचा वापर करतात. येथील स्थानिक माजी नगरसेवकांनी स्वतःच्या वर्चस्वासाठी सभागृहाचा वापर केला आणि किल्ली स्वतःजवळ ठेवून अडवणूक केली. पालिकेने प्रशासकीय काळात हि सभागृहे बंद करून ठेवली आहेत.त्यामुळे स्थानिक ...

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे दि. ८ - अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील   खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार ३१३ किलो भेसळयुक्त गुळ तर ८२ हजार ४४० रुपये किंमतीची २ हजार ७५० किलो भेसळयुक्त साखर जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर  कारवाई करण्यात येत आहे.  जानेवारी २०२२ मध्ये दोन गुळ उत्पादकावर धाडी टाकुन ३ लाख ६७ हजार ९०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार १६२ किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये हातवळण येथील गुळ उत्पादकावर धाडी टाकुन गुळ व भेसळीसाठी वापरली जाणारी साखर जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी घेण्यात आलेले घेण्यात आलेले नमुने असुरक्षित असल्याचे घोषीत करण्यात आल्याने त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. जप्त केलेली साखर नष्ट करण्यात आली आहे. जुलै २०२२ मध्ये गुऱ्हाळ घरांना भेसळीसाठी पुरविण्यात येणारी ७ लाख ७५ हजार रुपये किंमतीची सुमारे २५ हजार किलो साखर जप्त करण्यात आली ...