पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर : (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने 60 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी/विद्यार्थींना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्याळवतील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थी/विद्यार्थीनींनी दि. 25 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. विशेष प्राविण्याने 60 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बाबर हॉस्पीटलच्या मागे, ताराराणी पुतळ्याजवळ येथे प्रत्यक्ष अथवा पोस्टाव्दारे अर्ज सादर करावेत....