पेठवडगाव : श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित,”कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव”येथे “एक दिवसीय TET,CTET,TAIT कार्यशाळा” संपन्न
पुणे मेट्रो लाईव्ह : पेठवडगाव : श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित,”कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव”येथे “एक दिवसीय TET,CTET,TAIT कार्यशाळा” आयोजित केली होती या या कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते प्र.प्राचार्य.श्री.सचिन शिवाजी पाटील(कै.रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालय,इंदोली) होते. या कार्यशाळेच्या वेळी कॉलेजच्या प्र.प्राचार्या.सौ.निर्मळे.आर.एल(कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड),पेठ वडगांव) आणि प्र.प्राचार्य.भोसले.एस.एम(इचलकरंजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय इचलकरंजी) उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राध्यापक सोरटे एस के यांनी केले.कार्यशाळेमध्ये प्र.प्राचार्या.श्री. सचिन शिवाजी पाटील सरांनी स 'TET,CTET आणि TAIT 'या परीक्षां विषयी बी.एड.च्या छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले. परीक्षेच्या वेळी प्रश्न सोडविताना येणाऱ्या अडचणीवर मार्ग कसे काढावेत हे सांगितले. तसेच प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना येणाऱ्या शंकांचे निरसन त्यांनी केले.या कार्यक्रमाच्या वेळी प्रा. सोरटे, प्रा. शिरतो...