Skip to main content

Posts

Showing posts from April 22, 2023

वस्ञोद्योगातील निर्यात संदर्भात चर्चासत्र संपन्न

  वस्ञोद्योगातील निर्यात संदर्भात चर्चासत्र संपन्न  पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी  दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व वस्त्रोद्योग समिती, मुंबई  यांच्या संयुक्त विद्यमाने वस्ञोद्योगातील निर्यातीमधील अडचणी व अद्ययावत प्रयोगशाळा इचलकरंजी मध्ये होणेसंदर्भात चर्चासत्र संपन्न झाले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पॉवरलूम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे यांनी केले.यामध्ये इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगातील प्रमुख केंद्र आहे. येथील उत्पादने मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावी यासाठी सदर चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सांगून उद्योजकांना निर्यात करताना काही अडचणी अथवा सुचना असतील तर त्यांनी त्या मांडाव्यात, असे सांगितले.  पिडीक्सीलचे चेअरमन विश्वनाथ अग्रवाल व उपस्थित कारखानदार यांनी निर्यातीमध्ये येत असलेल्या अडचणींबाबत मुद्दे उपस्थित केले. यावेळी निर्यात करतेवेळी कापडाचा दर्जा तपासण्यासाठी उच्चप्रतिची प्रयोगशाळा येथे असणे आवश्यक असल्याचे उद्योजकांनी सांगितले.  मुंबईचे वस्त्रोद्योग समितीचे सहाय्यक संचालक लुकेश पाटील यांनी उद्योजकांकडून आलेल्या सुचनांबाबत सकारात्मक ...

खिदमते अवाम तर्फे शीरखुर्मा वाटप कार्यक्रम

  खिदमते अवाम तर्फे शीरखुर्मा वाटप कार्यक्रम . पुणे मेट्रो लाईव्ह : पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी ईदचा सण साजरा केला जातो. रमजानचा एक महिना उपवास पूर्ण करून ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव नमाज अदा करतात आणि आपल्या परमेश्वराचे आभार मानतात, रमजानच्या शिकवणीने प्रेरित होऊन समाजात सेवा, शांतता आणि बंधुभावाचा व्यावहारिक संदेशही देतात. लोकांची एकता.कारण ईद हा एकमेव इस्लामी सण आहे जो तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा लोकांचे दु:ख आणि वेदना शेअर केल्या जातात आणि त्यांच्या आनंदात त्यांचाही समावेश होतो. ईद निमित्त खिदमते अवाम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने ईदच्या दिवशी विविध सामाजिक व कौमी यक्जाहती कार्यक्रमाचे आयोजन, ईद मिलन संमेलनांतर्गत चिंचवड शहरातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी निगडी नुरानी मशीद परिसर, शिरखुर्मा येथे विविध सामाजिक व कौमी यक्‍जाहती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्वसामान्य नागरिक, स्थानिक नगर सेवक, विविध पक्षांचे कार्यकर्ते व सर्व धर्माच्या लोकांव्यतिरिक्त पोलीस विभागाचे उच्च अधिकारी उपस्थित होते. या गोड ईदच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांनी शिरखुर्मा आणि सेवा...

भाजपा शहर कार्यलयात शिवजंयती,महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी ..........

  भाजपा शहर कार्यलयात शिवजंयती,महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी   पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी येथिल भारतीय जनता पार्टी शहर कार्यलय मध्ये आज शिवजयंती व बसवेश्वर जयंतीनिमित्त आज माजी पाणी पुरवठा मंत्री मा लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस व महात्मा बसवेश्वर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र आभिवादन करणेत आले . यावेळी शहर अध्यक्ष ॲड आनिल डाळ्या,मा नगरसेवक आब्राहिम आवळे जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग म्हातुगडे,अरविंद शर्मा दिपक पाटील,उत्तम विभुते रामदास कोळी,अमर कांबळे आरुण कुंभार सौ पुनम जाधव सौ आश्विनी कुबडगे,सौ निता भोसले ॲड भरत जोशी, दौलत पाटील, प्रविण पाटील ,प्रविण रावळ, प्रदिप मळगे,प्रमोद बचाडे,रोहित केसरवानी, बाबासो कोरे, दिपक राशिनकर ,महेश पाटील रामसागर पोटे, उमाकांत दाभोळे, सतिश पंडित,'आमित जावळे, सतिश भस्मे,प्रकाश खारगे, प्रदिप भंडारे, आदी भाजपा पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.