शिवसेनेच्या वतीने पोलिस महासंचालकांना भेटून दिले निवेदन आणि शिवसैनिकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर कार्यवाही करण्याची मागणी
पुणे मेट्रो लाईव्ह : ना. डॉ. नीलम गोऱ्हे, खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत, आ. अजय चौधरी, आ. सचिन अहिर, आ. मनीषा कायंदे, संजना घाडी यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट. आज राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले, मारहाणीच्या घटनेबाबत शिवसेनेच्या वतीने प्रत्यक्ष भेटून आज यावर नियंत्रण ठेवून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राज्यात झालेल्या विविध घटनांवर कार्यवाही करावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. या सर्व घटनांवर विशेषत: पुण्यातील घटनेवर प्राधान्याने योग्य ती कार्यवाही करण्याचे आणि त्याचा अहवाल तयार करण्याचे पोलिस महासंचालकांनी मान्य केले. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या सुधारणा करून परिवहन विभागाचे परिपत्रक दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले. महाराष्ट्र पोलीस मागील काही महिन्यांत गुजरात, आसाम, गोवा राज्यात जास्त दिवस गेले होते तेंव्हा त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विचारला. याला खा.विनायक राऊत यांनी पाठिंबा दिला. यावर माहित...