प्राचार्या श्रीमती आर.एल.निर्मळे मॅडम, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप
प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव .संस्थेचे संस्थापक श्री स्वर्गीय अशोकराव माने साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवार दिनांक 12.06 2023 रोजी "अवधूत विशेष मुलांची निवासी शाळा "अंबप येथे विद्यार्थ्याना कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती आर.एल.निर्मळे मॅडम, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी अवधूत विशेष मुलांच्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यांनी मतिमंद मुलांबद्दल माहिती दिली. तसेच त्यांचे संगोपन, स्वच्छ्ता, आहार, त्यांची ट्रिटमेंट औषधे, त्याची राहण्याची सोय, मुलांच्या व पालकांच्या समस्या, 18 वर्षाखालील विद्यार्थी व 18 वर्षांवरील विद्यार्थी तसेच शिक्षकांची जबाबदारी व शाळेची सविस्तर माहिती दिली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ आर.एल.निर्मळे- चौगुले यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणची माहिती घेतली.तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती घेवून त्यांना मार्गदर्शन केले.त्याचबरोबर विशेष शाळा म्हणजे काय? विशेष शाळेमध्ये शिक्षक नियुक्तीसाठी कोणत्या प्रकारचे बी. एड कोर्स करावा, तसेच विशेष शाळेतील शिक्षकांच्या जबाबदाऱ्या, शाळेची जबाबदारी , विषेश मुलासाठी शासनाचे नियम , सवलती तसेच कायदे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी बी. एड. कॉलेज च्या प्राचार्या निर्मळे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बी. एड चे विद्यार्थी तसेच अवधूत विशेष मुलांच्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment