नंबरप्लेटवर क्रमांक न टाकता पोलीस, पत्रकार अथवा पक्षाचे चिन्ह टाकतात. अशा वाहनांवर पुणे वाहतूक पोलीसांची कारवाई करण्यात येत आहे. पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : वाहनांच्या नंबरप्लेट आणि वाहनावर दादा, मामा, पोलीस, पत्रकार असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच, अनेक जण नंबरप्लेटवर क्रमांकाव्यतिरिक्त दादा, नाना, काका यांसह पोलीस, पत्रकार, व्हीआयपी असे देखील लिहितात. मात्र, शासनाने निर्देशित केलेल्या क्रमांका शिवाय वाहनावर काहीही लिहिणे हा अपराध आहे. तरीदेखील सर्रास अशी वाहने आपल्याला सर्वत्र फिरताना दिसतात. मात्र, आता शहर वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाहनाच्या नंबरप्लेटवर क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. अनेक जण विशिष्ट प्रकारचे क्रमांक घेऊन नंबरप्लेटवर दादा, मामा, काका असे लिहितात. तसेच, नंबरप्लेटवर क्रमांक न टाकता पोलीस, पत्रकार अथवा पक्षाचे चिन्ह टाकतात. अशा वाहनांवर पुणे वाहतूक पोलीस कारवाई करीत असून, पहिल्यांदा पकडल्यावर 500 आणि दुसर्यांदा त्याच ...