Skip to main content

Posts

Showing posts from March 16, 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अडून कोणी राजकारण करत असेल तर जशास तसे उत्तर देऊ

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अडून कोणी राजकारण करत असेल तर जशास तसे उत्तर देऊ पुतळा समितीने सुचवलेल्या जागेवर लवकरच भूमिपूजन पुणे मेट्रो लाईव्ह : शिरोळ / प्रतिनिधी      न्यायालयाच्या जागेवर तांत्रिक अडचण असल्याने पुतळा त्या ठिकाणी नाही हे जवळपास निश्चित झाले असतानाही काही समाजातील स्वयंघोषित कार्यकर्त्यांनी आपली दुकानदारी कायम सुरू ठेवावी यासाठी  किंवा कुणाची तरी मर्जी सांभाळण्यासाठी सुपारी बहाद्दरांनी चालवलेला खटाटोप कदापि यशस्वी होणार नाही.अशा दिशाभूल करणाऱ्या ढोंगी कार्यकर्त्यापासून तमाम दलित बांधवांनी सावध रहावे आशा संतप्त भावना शिरोळ तालुक्यातील विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या शाहूनगर येथील बौद्धविहारात आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केल्या.बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरपीआयचे अब्दुल बागवान होते.यावेळी पुतळा समितीचे उपाध्यक्ष विजय पवार उपस्थित होते.यावेळी भन्ते यश काश्यपायन यांनी पुतळा समितीच्या बैठकीत उपस्थित राहून आशीर्वाद दिले.   प्रारंभी माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निवडणूकित दिलेले आश्वासन पाळले...