Skip to main content

Posts

Showing posts from July 6, 2022

लेटेस्ट अपडेट :पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

इचलकरंजी : मनु फरास : इचलकरंजी :    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२ फुटांपर्यंत पोहचली (इशारा पातळी ३९ तर धोका पातळी ४३ फुट). तर आज पंचगंगा नदीची पातळी सकाळी 8.00  वाजता  58 फुटावर आहे , इशारा पातळी 68, धोका पातळी 71 आहे. आम. प्रकाश आवाडे यांचे कडून पूरस्थितीची पाहणी   इचलकरंजी : राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परिस्थितीची माहिती घेतली. पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालल्याने पंचगंगा नदीला आलेल्या पुराची पाहणी करून सुचना करताना नदीक ाठावरील तसेच मळेभागातील नागरिकांनी सतर्क रहावे, अशा सूचनाही आमदार आवाडे यांनीय या वेळी केल्या.यावेळी केल्या.

लोकभ्रम नवे - जुने

पुणे मेट्रो लाईव्ह :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) जून महिना कोरडा गेला आणि जुलैचा पहिला आठवडा कोसळू लागला आहे.असाच बदल महाराष्ट्राच्या राजकारणात ही झाला.त्यातूनअखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी  ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी ना.देवेंद्र फडणवीस यांनी  शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या चार दिवसात होईल.उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. सत्ताधारी  आघाडीतील एका पक्षाचा एक मोठा गट विरोधकांबरोबर सत्ता स्थापावी ही भूमिका घेऊन करत असलेले नऊ दिवस आणि नऊ रात्री चाललेले नवनाट्य अखेर संपले.या साऱ्या वर्तमानाची व सत्ता बदलाची समीक्षा त्यातील पात्रेच कालांतराने स्वतःच करतील. वेषांतर ,अंधार भेटी वगैरेची चर्चा आता काही पात्रांच्या घरातून सुरू झालीच आहे.राजकारण ही गोष्ट बाजूला ठेवली तरी उद्धव ठाकरे यांनी ज्या शांततेने ,सहजपणाने,संयतपणे मुख्यमंत्री पदासह आमदारकीचाही राजीनामा दिला ते कौतुकास्पद आहे. सत्तेच्या राजकारणाचा प्रशासकीय अनुभव नसूनही त्यांनी असंख्य मनात कुटुंबप्रमुख म्हणून जे स्थान मिळविले तो राजकीय प्रगल्भपणा...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

  पुणे मेट्रो लाईव्ह :   मुंबई, दि. ६ (रा.नि.आ.) : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर २२ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.   भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून २२ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या २९ जुलै २०२२ रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.  निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, स...

मॉन्सून अपडेट: जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या दुर्घटना तसेच अनुषंगिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन पुणे मेट्रो लाईव्ह : सातारा दि.6: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्‍ये आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी तहसील कार्यालयांमधील दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांकाची माहिती पुढीलप्रमाणे.        जिल्हा नियंत्रण कक्ष- 1077, तहसिल कार्यालय, सातारा- 02162 - 230681, भ्रमणध्वनी-9158303900, तहसील कार्यालय, कोरेगाव-02163 - 220240, भ्रमणध्वनी-9545468281,  तहसील कार्यालय, जावली-02378 - 285223, भ्रमणध्वनी-9403683444, तहसील कार्यालय, वाई-02167 - 227711, भ्रमणध्वनी-9850030074, तहसील कार्यालय, महाबळेश्वर-02168 - 260229, भ्रमणध्वनी-9420125556, तहसील कार्यालय, खंडाळा-02169 - 252128, भ्रमणध्वनी-7030833939, तहसील कार्यालय, फलटण-02166- 222210, भ्रमणध्वनी-...

पुणे शहरात मुसळधार पावसामुळे शहरात पाच तासातच 13 जागी झाडे पडल्याच्या नोंदी

कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे मेट्रो लाईव्ह : पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाने माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाच तासातच या दरम्यान 13 ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. अनेकदा या प्रकरणामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होतं. मात्र यावर्षी अजून असं कोणतंच प्रकरण समोर आलं नाही आहे. त्यामुळे सध्यातरी नागरिकांना दिलासा आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे शहरात पाच तासातच 13 जागी झाडे पडल्याच्या नोंदी अग्निशमन दलाकडे आल्या होता. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाडे हटविण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील दत्तवाडी (पोलिस चौकीजवळ), शिवणे,(शिंदे पुलाजवळ), टिंगरेनगर (गल्ली क्रमांक 6), लुल्लानगर, भवानी पेठ (मनपा वसाहत क्र 10), औंध (आंबेडकर चौक), प्रभात रोड (लेन नं 14), नवीन सर्किट हाऊसजवळ, नाना पेठ (अशोका चौक), कळसगाव (जाधव वस्ती), हडपसर, कोथरुड, (मयुर कॉलनी), एरंडवणा (गुळवणी महाराज रस्ता) या सगळ्या परिसरात झाडे पड...

एकाच दणक्यात संपुर्ण वाहतूक विभागातील बदल्या केल्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळित राखण्यासह वाहतूक विभागावरही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार त्यांच्या आदेशाप्रमाणे वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी विभागातील 31 पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षकांच्या झटक्यात अंतर्गत बदल्या केल्या आहेत. एकाच दणक्यात संपुर्ण वाहतूक विभागातील बदल्या केल्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. वाहतूक विभागातील काही अधिकारी मागील काही महिन्यांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून आले होते. विशेषतः परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात नव्हते. त्यामुळे संबंधितांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. वारंवार वाहतूककोंडी संदर्भात तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक उपायुक्त राहूल श्रीरामे यांना अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.5) वाहतूक विभागातील 31 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नवनियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी वाहतूककोंडी सोडविण्यावर भर दे...

जिल्हा परिषदा व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

पुणे मेट्रो लाईव्ह : रायगड जिल्हा : सुनील पाटील   महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम ,1961 मधील कलम 12 उपकलम(1),कलम 58(1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हापरिषदा व पंचायत समित्या(जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम,1996 नुसार अनुक्रमे जिल्हापरिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेवून अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणी उर्वरीत स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.त्याकरीता आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे :-     जिल्हा परिषदेचे नाव/पंचायत समितीचे नाव : रायगड जिल्हा परिषद, सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण-जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन सभागृह, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022. ...

मराठा हायकर्सतर्फे पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिम

पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी येथील मराठा हायकर्स यांच्यावतीने 16 व 17 जुलै रोजी राजस्तरीय शिवयोद्धा पावनभूमी म्हणून पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिम आयोजित केली आहे. साधारण या मोहिमेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 400 च्या आसपास मोहिमवीर सामील होतील असा विश्‍वास आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मराठा हायकर्स ऑफीस गांधी पुतळा, मंगळवार पेठ, चौंडेश्‍वरी मंदीर यांचेशी संपर्क साधावा. इच्छुकांनी 10 जुलैपर्यंत फॉर्म भरुन देणेचे  आहे.  तसेच युवती, महिलांकरिता स्वतंत्र सोय आहे. महिला प्रमुख म्हणून सौ. शितल जाधव, सौ. मनिषा खेुबुडे असून मोहीम प्रमुख म्हणून पंढरीनाथ फाटक, आनंदा थोरवत, खेबुडे, सागर जाधव आहेत. या मोहिमेत सहभागी होणार्‍या 15 वर्षाखालील मुला-मुलींनी पालकांची लेखी संमती घेऊनच फॉर्म भरणेचे आहेत. इतिहासाची जागृती तसेच निसर्गातील विविधतेची ओळख व्हावी या जाणिवेतून इचलकरंजीतील काही जाणकार मंडळी व युवकांनी मागील 29 वर्षापासून विविध गड, किल्ले, सागरी किनारा, जंगल ट्रॅक आयोजन केले जात आहे. गेले वर्षभरात त्यांनी रायरेश्‍वर, रांगणा, वासोटा किल्ला, तसेच दाजीपूर जंगल ट्रॅक, गणपतीपुळे ते रत्...

मनपा जल पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणा

व गैर कारभारामुळे अनेक नागरिकांना/सोसायट्यांना सलग दोन दिवस पाणी मिळालेलं नाही - आप, पुणे पुणे : खडकवासला धरणात यंदा कमी पाणी साठले आहे या कारणास्तव महापालिकेने पुण्यात एक दिवसाआड (सम-विषम तारखेनुसार) वेळापत्रक काढले होते. या पत्रकानुसार ४ जुलै ते ११ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल हे आश्वासन देखील मनपा अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र पहिल्याच दिवसापासून ही आश्वासने खोटी ठरली आहेत. पुण्यात बर्‍याच क्षेत्रांमध्ये, ज्यात  शिवाजीनगर, भवानी पेठ, घोले रस्ता सारखे मध्यवर्ती भाग देखील येतात, यात सलग दोन दिवसापासून (४ व ५ जुलै) नळाद्वारे पाणी न आल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. मग असह्य होऊन नागरिकांनी व सोसायट्यांनी टँकरद्वारे आपली पाण्याची गरज भरून काढली.  *'आप'चे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार म्हणतात, "आजी-माजी नगरसेवकांनी या ज्वलंत मुद्द्याकडे निरंतर दुर्लक्ष केल्याकारणी जल पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य वर्षानुवर्षे नीट बजावले नाही. या संपूर्ण गैर कारभारामुळे शहरात आज असली दयनीय परिस्थिती सामान्य नागरिकाला भोगावी लागते. '२४/७ पाणी ...