पुणे मेट्रो लाईव्ह : अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. राज्य सरकारने कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून असलेले निर्बंध उठवल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बाजारपेठा भाविकांनी फुलून गेल्या आहेत. गेली दोन वर्षे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. मात्र यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे. याच उत्साहात भर घालण्यासाठी आणि मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी महाराष्ट्रातील निवडणूक अधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ट्विटरवर एक मीम शेअर करत गणेशोत्सव देखावा स्पर्धेबाबत माहिती दिली आहे. शाळा चित्रपटातील एका प्रसंगावर हा मीम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक आणि लोकशाही हे या स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धकांना या विषयांवर आकर्षक देखावा तयार करायचा आहे. या स्पर्धेचा कालावधी 31 ऑगस्ट त...