Skip to main content

Posts

Showing posts with the label दौंड पुणे

दौंड मध्ये मो. पैगंबर जयंती..साजरी करण्यात आली.

विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे मेट्रो लाईव्ह :   दौंड. : शाही आलमगीर मशीद येथे कब्रस्तान कमिटीच्या वतीने, शहरातील मदरसा, मशिदींमध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छोटीशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. धार्मिक शिक्षणामध्ये त्यांना शिकविल्या जाणाऱ्या शिक्षणाचे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले.  या धार्मिक उपक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.  या कार्यक्रमाचे आयोजन कुमेल कुरेशी, राजू सय्यद, जहूर शेख, रियाज सय्यद, सैदू शेख, फैयाज सय्यद, वाहिद सय्यद, मुसा शेख, असरत शेख या सर्वांनी केले.