स्टार्टअप यात्रेद्वारे युवकांना नावीन्यपूर्ण संकल्पनेची माहिती पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेअंतर्गत पुणे शहर, हवेली व शिरुर तालुक्यातील युवा विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याअनुषगांने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान अंतर्गत जिल्ह्यात मोबाईल व्हॅनद्वारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ हांडेवाडी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरूर, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविध ठिकाणी भेटी देण्यात आल्या. तालुकानिहाय सत्राचे १९ ऑगस्ट रोजी पुरंदर, बारामती, वेल्हे व भोर, २३ ऑगस्ट रोजी इंदापूर व २९ ऑगस्ट रोजी जुन्नर आणि ३० ऑगस्ट रोजी खेड व आंबेगाव तालुक्यात आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नवउद्योजकांनी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. जिल्हयातील अधिकाधिक उमेदवारांनी ...