पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी : शासन आपल्या दारी अभियानासाठी आज मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा आहे. या कार्यक्रमासाठी इचलकरंजी बसस्थानकातून बहुतांश एसटी बसेस गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बसस्थानकात धाव घेऊन अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकार्यांनी शासन आदेशानुसार बसेस नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगितले. शासन अपल्या दारी या अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी कोल्हापूर दौर्यावर आहेत. त्यामुळे शासन आदेशानुसार इचलकरंजी बसस्थानकातील बहुतांश एसटी बसेस या कार्यक्रमाला नागरीकांना ने- आण करण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसत होती. अनेकांनी बसेसबाबत विचारणा केली असता बसेस नसल्याचे सांगण्यात अले. त्यामुळे लांब पल्यावरून आलेले प्रवाशी तसेच इचलकरंजी बसस्थानकातून पुढील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांतून संताप व्यक्त होता. याबाबत माहिती मिळताच कॉग्रेसचे पदाधिकारी, कार...