Skip to main content

Posts

Showing posts from July 19, 2022

मुळशी धरण परिसरातील कंपने भूकंपाची नाहीत

  लिंबारवाडी भूस्खलनाची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षणा बाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची जीएसआयला सूचना  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, दि. १९: मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला (जीएसआय) सर्वेक्षण करण्याबाबत कळवले आहे. दरम्यान मुळशी धरण परिसरात नोंद झालेली कंपने भूकंपाची नसून अतिशय कमी तीव्रतेची असल्याची माहिती टाटा पॉवरकडून देण्यात आली. टाटा पॉवरने मुळशी धरण परिसरात भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाल्याबाबत प्रथमदर्शनी कळवले होते. तथापि, नोंद झालेली कंपने ही भूकंपाची नसून ४०-४२ किमी परिघामधील विस्फोट, भूस्खलन आदी स्वरुपाच्या आघातजनक घटनांमुळे झाले असल्याचा अंदाज आहे. नोंद झालेली कंपने अतिशय कमी तीव्रतेची (०.२ जी) असल्याचे दिसून आले, असे टाटा पॉवरकडून सांगण्यात आले. त्यामुळे लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी या जागेचे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे जीएसआयला कळवले आहे.

मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर संजय पांडे को ईडी ने आज को गिरफ्तार कर लिया

  पुणे मेट्रो लाईव्ह : मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर संजय पांडे को ईडी  ने आज  को गिरफ्तार कर लिया है। उन्हें मनी लॉन्ड्रिंग एक्ट के तहत गिरफ्तार किया गया है। संजय पांडे नेशनल स्टॉक एक्सचेंज  के कर्मचारियों के फोन टैपिंग से जुड़े मनी लॉन्ड्रिंग के मामले में पूछताछ के लिए आज ईडी के सामने पेश हुए थे। उनसे बीते दिन सोमवार को भी पूछताछ की गई थी। ईडी ने सोमवार को उनसे 3 घंटे तक पूछताछ की थी।  संजय पांडे 1986 बैच के भारतीय पुलिस सेवा (आईपीएस) के अधिकारी हैं। वे 30 जून को रिटायर हुए थे। मुंबई के पुलिस आयुक्त के रूप में अपने चार महीने के कार्यकाल से पहले उन्होंने महाराष्ट्र के कार्यवाहक पुलिस महानिदेशक के रूप में भी सेवाएं दीं। उन पर आरोप है कि 2009-17 के बीच एनएसई कर्मचारियों की अवैध फोन टैपिंग की गई, जिसमें 'आईसेक सिक्योरिटीज प्राइवेट लिमिटेड' नामक कंपनी की कथित तौर पर संलिप्तता है। जांच में यह पाया गया कि संजय पांडे कंपनी के कामकाज और गतिविधियों से निकटता से जुड़े हैं। इस कंपनी ने एनएसई का सिक्योरिटी ऑडिट किया था। आईसेक सिक्योरिटीज कंपनी में मार्च 2001 में संजय पांडे ...

तिळवणी येथे लोक क्रांती विकास आघाडी हात. तालुका महिला आघाडी. संगीता आवळे यांच्या माध्यमातून विधवा महिला व शिक्षक वृंदांचा केला सन्मान करण्यात आला

पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी : आज मंगळवार दि. 19/7/22 रोजी तिळवणी येथे लोक क्रांती विकास आघाडी हात. तालुका महिला आघाडी. संगीता आवळे यांच्या माध्यमातून विधवा महिला व शिक्षक वृंदांचा  केला सन्मान करण्यात आला .  . या समारंभाच्या वेळी गावातील विधवा महिलांना लोकक्रांती विकास आघडीच्या माध्यमातून  साड्या व वृक्ष देऊन त्यांचा केला गौरव केला तसेच गावातील शिक्षकांना सुद्धा  पुस्तक व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला .  या वेळी तिळवणी चे लोकप्रिय सरपंच मा श्री राजेश पाटील उपसरपंच मा श्री दीपक गायकवाड यांच्या शुभ हस्ते साड्या व वृक्ष वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट रित्या नियोजन तिळवणीच्या. श्रीमंती संगीता आवळे व   कोरोची शहर अध्यक्ष श्री सलिम माणगावे  यांनी केले तसेच गावातील शिक्षकांचा सन्मान आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्ता मांजरे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष दत्तात्रय गोडबोले यांच्या शुभहस्ते पुस्तक व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले  या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तिळवणी गावचे सरपंच मा. श्री राजेश पाटील,मा.श्री उपसरपंच गायकवाड,...

मनसे तर्फे शालेय विद्यार्थ्यांना 10000 मोफत वह्या वाटप.

पुणे मेट्रो लाईव्ह : जीलानी उर्फ मुन्ना शेख : पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाच्या वतीने विभाग अध्यक्ष श्री अजय कदम यांच्या वतीने रास्ता पेठ भागामध्ये व संपूर्ण विभागांमध्ये दहा हजार मोफत वही वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी मनसे नेते बाबू वागस्कर शहराध्यक्ष साईनाथ बाबर बाळा शेडगे रणजीत शिरोळे प्रल्हाद गवळी महिला शहराध्यक्ष वनिताताई वागस्कर व परिसरातील प्रमुख व्यापारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .   कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विभागाध्यक्ष अजय कदम अनुप जाधव रवी भोसले शिरीष आगुरेड्डी रितेश सी कोत्रे हेमंत बोलगे विशाल पवार सचिन दोडके अमित सारथे सागर गोरे मयूर पाटील भूषण शिंदे कैलास परदेशी आधी सर्व शाखा अध्यक्ष उपस्थित होते. रास्ता पेठ येथे मोठ्या प्रमाणात खड्डे , तिथे वृक्षारोपण करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे मतदार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या चौकामध्ये रास्ता पेठ येथे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत तिथे वृक्षारोपण करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला त्याप्रसंगी विभागाध्यक्ष अजय कदम अन...

RBI चे महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध ठेवीदारांना फक्त 15 हजार रुपयेच काढता येणार

पुणे मेट्रो लाईव्ह : रायगड जिल्हा  : सुनील पाटील भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर  निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना खात्यातून फक्त 15 हजार रुपये काढता येणार आहेत.बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांचं आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, रायगड सहकारी बँकेवरील निर्बंध हे सहा महिन्यांसाठी असतील. बँकेतील बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ठेवीधारांना 15 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लागू केले म्हणजे त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द होणार असा त्याचा अर्थ होत नाही असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेची आर्थिक स्थिती निर्बंधांसह बँकेला बँकिंग व्यवसाय करता येऊ शकेल असेही आरबीआयने म्हटले. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवदेनानुसार, बँकेच्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्बंधांच्या निर्देशात बदल होऊ शकतात. दरम्यान, आरबीआयने बीड येथील श्री छत्रपती राजर्ष...