Skip to main content

Posts

Showing posts from July 8, 2022

मुसळधार पावसाने लोणावळ्याला झोडपून काढले

वाकसई, सदापूर, वाकसई चाळ, कार्ला, मळवली परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात शेती पाण्याखाली गेली आहेत. पुणे मेट्रो लाईव्ह : पिंपरी :   गेल्या चार पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने लोणावळ्याला झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासांत शहरात 180 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे त्या मुळे वाकसई, सदापूर, वाकसई चाळ, कार्ला, मळवली परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात शेती पाण्याखाली गेली आहेत. शहरातील अनेक रस्ते पाण्यात गेले आहेत. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जूनमध्ये पाऊस लांबल्याने निर्माण झालेल्या सरासरीचा फरक जेमतेम काही दिवसांत पुर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोणावळा शहरात आजपर्यंत 907 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत 1132 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

प्रशासकीय यंत्रणांनी जनतेची कामे तत्‍परतेने पूर्ण करावीत - पालक सचिव सुमंत भांगे

पुणे मेट्रो लाईव्ह :     अहमदनगर, 08 जूलै (जिमाका वृत्तसेवा) - शासकीय कार्यालयामध्‍ये येणा-या नागरीकांची शासकीय कामे  प्रशासनातील अधिका-यांनी तत्‍परतेने पुर्ण करावीत. तसेच शासनाने सोपवून दिलेले कामे वेळेत पूर्ण करण्‍यावर अधिका-यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा जिल्‍ह्याचे पालक #सचिव तथा सामान्‍य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी व्‍यक्‍त केली. आज #जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, अतिवृष्‍टी, पर्जन्‍यमान बी-बीयाणे, खतांचा पुरवठा आदी विषयांबाबतच्‍या आढावा बैठकीत पालक सचिव श्री. भांगे बोलत होते.    या आढावा बैठकीला जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्‍हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्‍त शंकर गोरे, अपर जिल्‍हाधिकारी सोनाप्‍पा यनगर, निवासी उपजिल्‍हाधिकारी संदिप निचित आदी विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.             पालक सचिव श्री. भांगे पुढे म्‍हणाले, आपली शासकीय कामे वेळेत व्‍हावीत अशी जनतेची अपेक्षा असते. त्‍यांच्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी प्रशासनाने गतीमान ...

इचलकरंजीत गुरुवारी कवी संमेलनाचे आयोजन

पञकार संघातर्फे रामचंद्र ठिकणे यांची माहिती पुणे मेट्रो लाईव्ह :   इचलकरंजी येथे इचलकरंजी शहर पञकार संघातर्फे शहर परिसरातील ज्येष्ठ व नवोदित कवींसाठी गुरुवार दिनांक १४ जुर्ले रोजी पञकार कक्षामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. इचलकरंजी शहरातील पञकार संघातर्फे दरवर्षी पञकार दिन साजरा करण्याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.याशिवाय विविध सामाजिक उपक्रम राबवण्यावर देखील विशेष भर देण्यात येतो.याच अनुषंगाने इचलकरंजी शहर परिसरातील ज्येष्ठ व नवोदित कवींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने 

पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट मिळण्यासाठी पासची सुविधा

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे दि.८-पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनाला पथकरातून सूट मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून स्टिकर्स किंवा पास घेणे आवश्यक असून त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे  तसेच संबंधित पोलीस स्टेशन येथे सुविधा करण्यात आली आहे. पंढरपूरला जाताना आणि येताना १५ जुलै २०२२ पर्यंत या कालावधीत पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनासाठी ही सुविधा असेल. संबंधितांनी वाहन क्रमांक, चालकाचे नावासह अर्ज करून पास प्राप्त करून घ्यावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक , आयुक्तांना निर्देश             वाहनचालकांचा खोळंबा नको  मुंबई दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी  स्पष्ट केले. मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतुक रोखण्यात येते. त्या...