पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख देहूरोड; दि.१५ ऑगस्ट ७५ वा स्वातंत्र्य दिवस अमृत महोत्सव मोठ्या उत्साहा आणि जल्लोषात आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला, संपूर्ण देहूरोड शहर तिरंगामय झाला होता,ठीक ठिकाणी ध्वजारोहणचे कार्यक्रम संपन्न झाले, शहरात सामाजिक संघटन व राजनीतिक पक्षांकडून दुचाकी वरून भव्य-तिरंगा रॅली काढण्यात आली, तर जय भवानी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था च्या वतीने ऐतिहासिक बाबासाहेब आंबेडकर कमानी समोर रिक्षा स्टॅन्ड वर ध्वजारोहण करण्यात आले, तसेच शाळेकरी मुलांना मोठ्या प्रमाणात खाऊ वाटप या संस्थेच्या वतीने करण्यात आले.तसेच जय भवानी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा या संस्थेने देहूरोड शहरातील ऐतिहासिक सुभाष चौक बाजारपेठेतून भव्य-रीक्षा तिरंगा रॅली चे आयोजन केले होते. भव्य-रिक्षा तिरंगा रॅली देहूरोड शहरवासीयांना आकर्षक करत होती. भारत माता की जय, भारतीय स्वतंत्र 75 व्या अमृत महोत्सव दिनाचा विजय असो च्या गर्जनांनी पूर्ण देहूरोड शहर दुंम-दूमुन गेले. एड .कैलाश पानसरे ( देहूरोड छावणी प्रशासक ) यांनी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था यांच्या सामाजि...