प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापन दीन सोहळा श्री राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे संपन्न होणार
पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : येथील आघाडीचे न्यूज पोर्टल प्रेस मीडिया लाईव्हचा तिसरा वर्धापन दीन सोहळा दिनांक 29.05.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता कोल्हापूर येथे श्री राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे संपन्न होणार आहे. या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.आमदार श्रीमती जयश्री जाधव कोल्हापूर , कार्येक्रमाचे अध्यक्ष श्री. प्रसाद कुलकर्णी, इचलकरंजी हे आहेत , तर कार्येक्रम प्रमुख उपस्थिती म्हणून दैनिक लोकसत्ताचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी मा.श्री. दयानंद लिपारे , ज्येष्ठ कवी श्री पाटलोबा पाटील , दैनिक ग्रामदेवता चे संपादक श्री.सखाराम जाधव हे आहेत. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री मुरलीधर कांबळे ( पत्रकार ) हे आहेत.