वाकसई, सदापूर, वाकसई चाळ, कार्ला, मळवली परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात शेती पाण्याखाली गेली आहेत. पुणे मेट्रो लाईव्ह : पिंपरी : गेल्या चार पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने लोणावळ्याला झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासांत शहरात 180 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे त्या मुळे वाकसई, सदापूर, वाकसई चाळ, कार्ला, मळवली परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात शेती पाण्याखाली गेली आहेत. शहरातील अनेक रस्ते पाण्यात गेले आहेत. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जूनमध्ये पाऊस लांबल्याने निर्माण झालेल्या सरासरीचा फरक जेमतेम काही दिवसांत पुर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोणावळा शहरात आजपर्यंत 907 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत 1132 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.