असलम इसाक बागवान यांच्या उपोषणाची सांगता पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कोंढव्यातील इमाम अबु हनिफा,डॉ. आंबेडकर सभागृहे नागरिकांच्या कार्यक्रमांना खुली करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने मान्य केल्याने इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान आणि सहकाऱ्यांचे पालिकेसमोर सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले. २२ ऑगस्ट रोजी उपोषणाची सांगता पालिकेचे समाज विकास अधिकारी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली. स्थानिक माजी नगरसेवकानी ही सभागृहे बंद ठेवण्यासाठी महानगर पालीका अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्यात माजी नगरसेवक रईस सुंडके यांचाही सहभाग होता. ही सभागृहे उघडण्यासाठी आणी शिवनेरीनगर येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हॉल येथे गरीबांच्या हाताला रोजगार तसेच महिला रोजगार प्रशिक्षण केंद्र (लाईट हाऊस) सूरू करण्यासाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप गेली दोन वर्ष प्रयत्न करीत होते . या प्रयत्नांना यश आले आहे. उपोषणामध्ये असलम इसाक बागवान,इब्राहिम शेख, रियाज बंगाली,अब्दुल बागवान,सादिक पानसरे,अ...