पुणे मनपाच्या प्राथमिक शाळेत गेल्या चौदा वर्ष मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने व्हावी .. शिक्षक प्रकाश शिंदे . पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे मनपाच्या प्राथमिक शाळेत गेल्या चौदा वर्ष मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांनी काल पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उच्च न्यायालयाने या शिक्षकांना सेवेत कायम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयीन आदेशाची महापालिका प्रशासनाने चार महिन्यानंतरही अंमलबजावणी न केल्याने शिक्षकांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. पुणे महानगरपालिके मध्ये 2009 आणि 2011 या वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने रजा मुदत शिक्षण सेवक म्हणून ही शिक्षक भरती करण्यात आली होती. पुढे 2017 मध्ये या शिक्षकांना सेवेत कायम करायला राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने आदेश दिले होते , मात्र त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. या विरोधात प्रकाश शिंदे आणि इतर शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देत मुंबई उच्च न्यायालयाने सर्व 93 शिक्षकांना सेवेत कायम करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश फेब्रुवारी 2023 मध्ये महापालिकेस दिले. पुणे महापालिकेस या साठी सहा आठवड्यांची ...