पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजानच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष इफ्तारचा कार्यक्रम संपन्न झाला.
पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजानच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष इफ्तारचा कार्यक्रम संपन्न झाला. क्रांतिवीर लहुजी वस्ताद एकता प्रस्थिठान व मातंग एकता आंदोलन पुणे शहर तर्फे प्रथमच पुणे येथील काशेवाडी भागात मुस्लिम महिलांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या देशाचे संविधान ज्या चार तत्वावर आहे त्यातील एक समानता आहे . आज आपल्या राज्यात अनेक रोजा इफ्तार कार्येक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यात फारच महिलांची संख्या कमी असते म्हणूनच महिलांसाठी असा उपक्रम राबवून एक दिवस महिलांसाठी रोजा इफ्तार चा कार्येक्रम ठेऊन त्यांना बोलाविण्यात आले होते . महाराष्ट्रातील हा पहिलाच कार्येक्रम आहे जो महिलांसाठी राबविण्यात आला आहे असे इफ्तार कार्येक्रमाच्या वेळी आयोजकांनी सांगीतले . या वेळी प्रमुख उपस्थिती माजी गृहराज्मंत्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ऊपाध्यक्ष रमेश दादा बागवे , काशेवाडी पोलिस चौक...