पुणे मेट्रो लाईव्ह : कबनूर येथे वाकरेकर मळा परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहनांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी ,अन्यथा मनसे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आला आहे. कबनूर येथे वाकरेकर मळा परिसरातील रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे.परंतू ,हा रस्ताअत्यंत खराब झाला असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.त्यात पावसाचे पाणी साचून वाहनांच्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे या खराब रस्त्यावरुन वाहने चालवताना वाहनधारकांची मोठी कसरत होत आहे.परिणामी ,वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या रस्त्यावरुन ये - जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.याबाबत वारंवार तक्रार करुनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत आहेत.त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी ,अन्यथा मनसे पक्षाच्या तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे उपतालुकाध्यक्ष दिपक पोवार व कबनूर शहराध्यक्ष निलेश भालेकर यांनी पञकारांशी बोलताना दिला. यावेळी मराठी कामगार सेना तालुकाध्यक्ष महेश शेंडे, मराठी कामगार सेना जिल्हा...